आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारवर टीका:महाविकास आघाडी सरकार अनैसर्गिक युतीची सत्ता असलेले सरकार असून त्यात अंतर्विरोध आहेत, त्यामुळे हे सरकार टिकणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा हल्लाबोल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ई-पासच्या मुद्द्यावर राज्य सरकारची विसंगती स्पष्ट झाली आहे - फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सोमवारी हल्ला चढवला. महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक युतीची सत्ता असलेले सरकार असून त्यात अंतर्विरोध आहेत. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असा दावा त्यांनी केला.

मंगळवारी पावसाळी अधिवेशनासंदर्भात बैठक होती. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून ठाकरे सरकार अस्थिर असल्याचा पुनरुच्चार झाला. अधिवेशनाच्या तोंडावर फडणवीसांनी सरकारविरोधातील आपली टीका तीव्र केल्याचे पाहायला मिळाले.

फडणवीस म्हणाले, “आम्ही सरकारकडे लक्षच देत नाही. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक अंतर्विरोध आहेत. हे सरकार अंतर्विरोधांनी भरलेले आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. त्यामुळे हे सरकार जितके दिवस चालायचे तितके दिवस चालेल. एक दिवस जाईल. त्यामुळे ते काय म्हणतात, हे काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही. ही अनैसर्गिक युती आहे. अशी अनैसर्गिक युती देशाच्या राजकारणात फारशी कधी टिकली नाही.’धोकादायक इमारतींची संख्या किती आहे हे तपासले पाहिजे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. सुशांतसिंह प्रकरणावर बोलताना त्यांनी लवकरच सीबीआय चौकशी पूर्ण करेल आणि सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे, ई-पासवर बोलताना ते म्हणाले, केंद्राचे निर्णय राज्य सरकार लागू करत नाही. ई-पासच्या मुद्द्यावर राज्य सरकारची विसंगती स्पष्ट झाली आहे. एसटीला ई-पास नाही, मग खासगी वाहनांना का आहे, असा सवाल त्यांनी केला. फडणवीस यांनी या वेळी ठाकरे सरकारने भाजप आमदारांची त्यांच्या मतदारसंघातली मंजूर झालेली विकास कामे रद्द केल्याचा आरोप केला. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.