आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंकडून जुना फोटो शेअर:स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनी आदित्य यांच आनंद दिघेंना अभिवादन

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या राजकीय कारर्कीदीतील मोठे नाव धर्मवीर आनंद दिघे यांचा आज स्मृतीदिन आहे. आनंद दिघेंच्या स्मृतीदिनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी एक खास ट्विट करत आनंद दिघे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये आनंद दिघे यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आनंद दिघे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यासोबत लहानपणीचे आदित्य ठाकरे दिसत आहेत. हा फोटो नवरात्रोत्सवातील असल्याचे दिसून येते. नवरात्रौत्सवात देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले असताना हा फोटो काढण्यात आला होता.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री होत थेट शिवसेनेवरच दावा केल्यानंतर आता ठाकरे कुटुंब प्रचंड सक्रिय झालं आहे. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचं वर्चस्व आहे. ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात चढाओढ सुरू आहे. या चढाओढीत धर्मवीर आनंद दिघे यांचे दोन शिष्य, एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर दुसरीकडे खासदार राजन विचारे आमने- सामने आहेत.

ठाणे टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमात जाऊन आशीर्वाद घेतले.
ठाणे टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमात जाऊन आशीर्वाद घेतले.

एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरून देखील आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “वंदनीय गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघेसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन” या कॅप्शनसहीत मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघेंना श्रद्धांजली अर्पण करणारी पोस्ट शेअर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ट्विट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ट्विट

दिघेंचा जन्म 27 जानेवारी 1952चा होता. तर ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरात त्यांचे घर होते. आनंद दिघे यांचे पूर्ण नाव आनंद चिंतामणी दिघे. बाळासाहेबांच्या विचारांकडे ते आकर्षित झाले. दिघेंनी स्वत:चे आयुष्य शिवसेनेसाठी अर्पण केले. ठाण्यातले शिवसैनिक आनंद दिघेंचे नाव आदराने घेतात. बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ, ठाणेकरांचे 'साहेब' अशी त्यांची ओळख होती. दिघे यांचा 25 ऑगस्ट रोजी पहाटे वंदना टॉकिजजवळ अपघात झाला. त्यांना तत्काळ सिंघानिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु 26 ऑगस्ट 2001 रोजी संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडली आणि संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हा अपघात एक घातपात असल्याचे सांगण्यात येत होते. आनंद दिघे यांचा मृत्यू नैसर्गिक होता की नाही हे आजपर्यंत उघड झालेले नाही.

बाळासाहेबांसोबत धर्मवीर आनंद दिघे.
बाळासाहेबांसोबत धर्मवीर आनंद दिघे.
बातम्या आणखी आहेत...