आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी मातोश्रीवर जात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यामुळे ते चर्चेत आले आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात मविआकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थोपविण्यासाठी रणनिती आखली जात असल्याची चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गेले काही दिवस ठाणे हे राज्याच्या राजकारणात केंद्र स्थानी असल्याचे दिसून येत आहे. यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मविआचा मोर्चा ठाण्यात काढत शिंदेंना ठाण्यात धक्का देण्यासाठी जोरदार तयारी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. यात शिवसेनेचे माजी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने पुन्हा ठाण्यात नवे समीकरण जुळतंय का असा प्रश्न राजकीय वर्तुळात अनेकांना पडला आहे.
श्रीकांत शिंदे हे ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात त्या मतदारसंघाचे 2009 मध्ये आनंद परांजपे योनी शिवसेनेकडूनच नेतृत्व केले आहे. 2014 ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीकांत शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती, यात त्यांचा पराभव झाला होता. मात्र, आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून ठाण्यात जुन्या शिवसैनिकांना बळ देण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभेला एकनाथ शिंदे यांना कल्याण लोकसभेच्या निवडणुकीत अडकवूण ठेवण्यासाठी मविआकडून ही तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. पण ही सदिच्छा भेट होती, असे परांजपे यांनी म्हटले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपसह शिंदेंकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र पक्ष फुटीनंतर या मतदारसंघात उद्धव ठाकरेंना देखील तगडा उमेदवार हवा आहे. आनंद परांजपे यांच्या रुपाने तशी चाचपणी उद्धव ठाकरेंकडून सुरू आहे की काय अशा चर्चांनी देखील जोर धरला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.