आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढच्या वर्षी लवकर या..:'वर्षा'वरील बाप्पांचे मुख्यमंत्री शिंदे, श्रीकांत शिंदेंनी केले विसर्जन; लालबागचा राजा गिरगाव चौपाटीकडे

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • पुण्यात बाप्पांंच्या मिरवणुकीत भक्तांचे कौतुकास्पद पाऊल; रुग्णवाहिकेला दिली मोकळी वाट

कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांच्या विघ्नानंतर राज्यात यंदा निर्बंधांविना गणेश उत्सव साजरा होत आहे. विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी सकाळपासून ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

आता सर्वच उत्सव धुमधडाक्यात

मुख्यमंत्री्एकनाथ शिंदे म्हणाले, गणपतीचे विसर्जन आज होत आहे. जल्लोष खूप आहे. गत दोन वर्षांपासूनची मरगळ संपली. गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. आता नवरात्रोत्सवही धुमधडाक्यात साजरा होणार आहे. राज्यात पुरामुळे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची घोषणा मी केली आहे.

राज्यभरातील विसर्जन अपडेट

 • पालघरमध्ये बाप्पांवर मुस्लिम समाजाकडून पुष्पवृष्टी
 • ​​​​​'वर्षा'वर कुटुंबियांसह ​​मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले बाप्पांचे विसर्जन
मुंबईत समुद्रकिनारी बाप्पांच्या विसर्जनासाठी आलेले गणपतीभक्त.
मुंबईत समुद्रकिनारी बाप्पांच्या विसर्जनासाठी आलेले गणपतीभक्त.

आज दहाव्या दिवशी गणेश मूर्तीचे सहा वाजेपर्यंत विसर्जन अहवाल

 • सार्वजनिक गणपती - 302
 • घरगुती गणपती - 7046
 • गौरी -73
 • एकूण - 7421

त्यापैकी कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन

 • सार्वजनिक - 53
 • घरगुती - 2394
 • गौरी - 35
 • एकूण - 2482
 • विसर्जनाच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही

दोन वर्षांनतर उत्सव साजरा होत असल्याने अनेक ठिकाणी बाप्पाच्या भव्य मिरवणुका काढण्यात येत आहेत. त्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पुण्यातील मिरवणूक सोहळ्यात हजारो भाविकांचा महापूर दाटलाय. यात एक सुखद घटना घडली. या मिरवणुकीच्या गर्दीत आलेल्या रुग्णवाहिकेला भाविकांनी वाट मोकळी करून दिली. त्याचे कौतुक होत आहे.

 • माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरच्या गणपतीचे विसर्जन, एकत्रिक केली आरती.
 • पुण्यात मानाच्या कसबा गणपतीचे विसर्जन; गिरगावमध्ये हेलिकाॅप्टरद्वारे बाप्पांवर पुष्पवृष्टी
 • औरंगाबादेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी लुटला ढोल वाजविण्याचा आनंद
 • मंत्री दादा भूसे यांच्या विवासस्थानी बाप्पाचे पूजन
 • अकोला येथील मानाचा श्री बाराभाई गणपतीची आरती झाल्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.
अकोल्यात मानाच्या गणपतीची निघालेली मिरवणूक आणि उत्साह संचारलेले भक्तगण.
अकोल्यात मानाच्या गणपतीची निघालेली मिरवणूक आणि उत्साह संचारलेले भक्तगण.
 • छगन भुजबळ हे आज अंजिरवाडी, माझगाव मुंबई येथे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहकुटुंब सहभागी झाले.
 • सोलापुरात गणेशोत्सावावेळी वाद:विसर्जन पद्धती आणि डॉल्बीला परवानगी न दिल्याने भाविक नाराज... वाचा सविस्तर
 • विसर्जन मिरवणुकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला आहे. औरंगाबादमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरवात झाली आहे. यावेळी अनेक राजकीय नेत्यांची या मिरवणुकीत सहभाग आहे.

औरंगाबादच्या विसर्जन मिरवणुकीत राजकीय मानपान नाट्य

औरंगाबाद शहरात सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थातीत विसर्जन मिरवणूक
औरंगाबाद शहरात सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थातीत विसर्जन मिरवणूक
 • युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी कसबा गणपतीचे दर्शन घेतले, यावेळी मंडळाकडून त्यांना आरतीचा मान देण्यात आला आहे. तर यावेळी त्यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांची देखील भेट घेतली आहे....वाचा सविस्तर
 • अहमदनगरचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या श्री विशाल गणेश मंडळाच्या मिरवणुकीस प्रारंभ, मिरवणुकीत ढोल -ताशे लेझीम या पथकांचा सहभाग, दर्शनासाठी भाविकांची गर्दी...वाचा सविस्तर
 • PHOTOS गणेश विसर्जन मिरवणुकीत कलाकार थिरकले:पुण्यात श्रुती मराठे, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधवचा जल्लोष...वाचा सविस्तर
विशाल गणेश मंडळाच्या मिरवणुकीस प्रारंभ
विशाल गणेश मंडळाच्या मिरवणुकीस प्रारंभ
 • नागपूरमध्ये ढोल - ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप; 390 कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक गणेशाचे विसर्जन... वाचा सविस्तर
नागपूरमध्ये ढोल - ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप
नागपूरमध्ये ढोल - ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप
 • मुख्यमंत्र्यांनी वरळी पोलिस वसाहतीतल्या बाप्पांचे, तर अजित पवारांनी घेतले दगडूशेठांचे दर्शन
 • राज्यभरातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप
 • केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, राज्यभरात जल्लोषात मिरवणुका
पुण्यात ढोलच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक, मिरवणुकीत ढोल वाजवताना अभिनेत्री श्रृती मराठे
पुण्यात ढोलच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक, मिरवणुकीत ढोल वाजवताना अभिनेत्री श्रृती मराठे
 • मनपाच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभुषण पाटील मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांची उपस्थिती...
 • केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी घेतले लालबागच्या राज्याचे दर्शन
 • चिंतामणीसह, बोरीवलीच्या राजाची मिरवणूक सुरू; बाप्पावर गुलालाची उधळण सुरू, तेजुकाया मंडळाची मिरवणूक ही जल्लोषात सुरू, मिरणुकीत हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी
 • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी 7 ते रात्रौ 8.30 वाजता गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जनानिमित्त उपस्थित राहणार.
 • लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ सदर बझारचे वरिष्ठ पोलीस अश्विनी भोसले यांच्यामध्ये डॉल्बी सिस्टम वरून वादावाद जगदंबा चौक येथे सर्व मंडळांचे ठिय्या आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती मोहरम या सणासाठी डॉल्बीला परवानगी मिळते तर गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला का नाही असा सवाल मंडळाकडून करण्यात आला, आंदोलन मागे घेण्याची शक्यता
सोलापुरात गणपती मंडळाचे ठिय्या आंदोलन.
सोलापुरात गणपती मंडळाचे ठिय्या आंदोलन.
 • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी येथील पोलिस वसाहतीत जात गणरायाचे दर्शन घेतले.
 • बाप्पाला निरोप:अजित पवार यांनी पत्नीसह घेतले दगडूशेठचे दर्शन, चंद्रकांत पाटील नाना पाटेकरांच्या घरी... वाचा सविस्तर
 • राज्याचे विरोधी पक्षाचे नेते अजित पवार यांनी पत्नीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणपतीला अभिषेक करून आरती केली केली आणि गणरायाला प्रार्थना केली.
मुंबईतील लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू.
मुंबईतील लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू.
 • अजित पवारांनी पत्नीसह घेतले दगडूशेठ हलवाईंचे दर्शन
 • औरंगाबादमध्ये संस्थान गणपतीची आरती; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडलेंची उपस्थिती.
 • मुंबईत समुद्रकिनारे, कृत्रिम तलाव विसर्जनासाठी सज्ज.
 • लालबागच्या राजरूाच्या विसर्जन मिरणुकीसाठी बँन्ड, लेझिम यांच्यासोबत ढोलताशाच्या पथकाच्या हजेरी असणार.
 • विसर्जनासाठी चौपाट्यांवर कडेकोट बंदोबस्तसीसीटीव्ही, ड्रोनद्वारे विसर्जन मिरवणुकींवर नजर.
 • प्रसिद्ध सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्या घरगुती गणपतीचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी नानांसोबतच्या चर्चांमध्ये अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
 • मुंबईतील 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद:गणेश विसर्जनासाठी वाहतूक पोलिसांचे नियोजन, 114 ठिकाणी नो पार्किंग...वाचा सविस्तर
 • मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर मनपाची जय्यत तयारी, 211 स्वागत कक्षांची उभारणी.
 • गणेश विसर्जनाची धूम:मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात; ढोल-ताशांचा गजरात 5 हजार भाविक सहभागी... वाचा सविस्तर
 • पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली असून मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी अन् पायघड्या घालण्यात आल्या आहेत. भाविकांचा उत्साह शिगेला... वाचा सविस्तर
 • पुण्यातील कसबा पेठेच्या गणेश विसर्जनाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.
 • श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विराजमान:मिरवणुकीसाठी मंडळाकडून जोरदार तयारी; शनिवारी पहाटे विसर्जन होणार... वाचा सविस्तर
 • कोल्हापुरात ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात.
 • सोलापुरात विसर्जन मिरवणुकीसाठी तगडा पोलिस बंदोबस्त;संवेदनशील भागात सशस्त्र पोलिस.
 • नाशिकमध्ये घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी यंदा शहरात पालिकेकडून 71 ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती.

गणपती विसर्जन कसे करावे ?

गणपती विसर्जन करताना कोणतीही पूजा करण्याची गरज नाही. विसर्जनाच्या वेळी गणपतीची योग्य पूजा करा, आरती करा आणि नंतर गणपती विसर्जन घरीच करणार असाल तर, परत गणेश आरती म्हणायची गरज नाही. आपण जर विहिरीवर नदीवर किंवा इतर ठिकाणी विसर्जन करणार असाल, तर तिथे पण गणपतीची आरती करा. योग्य पद्धतीने पूजा करा आणि प्रसाद वाटावा.

अवजड वाहनांना मुंबईत प्रवेशबंदी

आज विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सूट देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...