आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sonia Gandhi And Rahul Gandhi Ed Samons | Events That Raise Concerns About The Country's Future; People Will Show BJP Their Place Balasaheb Thorat

काँग्रेस सोनियांच्या पाठिशी:केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठ वर्षांपासून केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. त्यामाध्यमातून विरोधकांचा छळ करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे, देशाच्या भविष्याबाबत चिंता वाढवारी ही घटना आहे, असे म्हणत काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना चौकशीसाठी 8 जूनला बोलावले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी त्यांची ईडी चौकशी करणार आहे. त्यावर आयोजित पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. ते म्हणाले, धार्मिक तेढ निर्माण करून, लोकशाहीवर मोठा आघात होत आहे. आम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पाठिशी कायम आहोत. देशाची जनता देखील सोनिया गांधी आणि राहुल गांधी, काँग्रेसच्या पाठिशी उभी राहिल, असा विश्वास देखील थोरातांनी यावेळी व्यक्त केला.

नामोहरम करण्याचा प्रयत्न

राजकीय कारणांसाठी केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. विरोधकांना नामोहरण करण्यासाठी हा कारस्थान सुरू आहे, पण या प्रयत्नातून आमचे नामोहरम होणार नाही. उलट जनता आमच्या पाठिशी उभी राहिल आणि भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून देईल, असे थोरात म्हणाले.

भाजपात असंतोष

थोरात म्हणाले, राज्यात, देशात जे काही सुरू आहे हे जनता चांगल्या प्रकारे समजते. भारतीय जनता पक्षात असंतोष निर्माण राहिल्या शिवाय राहणार नाही. राहुल गांधी आणि सोनिया गांधींना ईडीची नोटीस म्हणजे लोकशाहीवर हा हल्ला आहे. पुढे लोकशाही चालेल की नाही, याची आता चिंता सतावते आहे. भाजप सत्तेत असल्याने ते केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहेत. राज्यात देखील ईडीच्या कारवाया सुरूच आहे आणि केंद्रात देखील तेच सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...