आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधेरी जिंकल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया:म्हणाल्या - हा विजय माझ्या पतीचा आहे, अंधेरीचा विकास हेच माझं ध्येय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हा विजय माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी त्यांची पूर्ण राजकीय कारकीर्दीत जी जनसेवा केली, त्याचीच पोचपावती म्हणजे हा विजय आहे. मतदारांनी त्याचीच परतफेड केली आहे, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी सर्वांचे आभार मानले. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाय. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय झालाय. ऋतुजा यांनी विजयानंतर अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.

रमेश लटके यांनी जी काही काम हाती घेतली होती, ती राहिली होती ती पूर्ण करणार आहे. अंधेरीचा विकास हेच माझे ध्येय आहे. उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वाद आणि आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्या साथ दिल्यामुळे मी जिंकले आहे. आता मातोश्रीवर जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे. हा विजय मविआचा आहे. मला उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हापासून तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. त्यांचे मी आभार मानते.

माझ्या पतीचे निधन झाले. त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली. मला खंत आहे की मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढावी लागली. म्हणून जल्लोष होणार नाही. पण, आम्हाला नवे पक्षचिन्ह मिळाले, त्या चिन्हाखाली हा विजय आहे. त्याचा जल्लोष होईल, असेही त्या म्हणाल्या.

आधीच उमेदवार जाहीर केला नसता
पत्रकार परिषदेत बोलताना लटके यांनी भाजपवर टीका केली. त्या म्हणाल्या की, भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी त्यांनी नोटाला पर्याय निवडण्याचे आवाहन केले होते. याबाबतचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता. नागरिकांनी नोटाला का जास्त मतदान केले? याबाबतचा प्रश्न तुम्ही मतदारांना विचारला पाहिजे की त्यांनी नोटाचे बटण का दाबले. नोटाला झालेले मतदान हे भाजपलाच मिळालेली मते आहेत. त्यांच्या मनात सहानुभूतीची भावना असती तर त्यांनी आधीच उमेदवार जाहीर केला नसता, अशी टीका त्यांनी केली.

ऋतुजा लटके या शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. मे महिन्यात रमेश लटके यांचं हृद्यविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झालं. त्यांना दोन मुले आहेत. रमेश लटके आमदार होण्यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते. 1997 ते 2012 या काळात ते तीन टर्म शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे रमेश लटके या मतदारसंघात जवळपास गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सक्रिय होते.
ऋतुजा लटके या शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. मे महिन्यात रमेश लटके यांचं हृद्यविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झालं. त्यांना दोन मुले आहेत. रमेश लटके आमदार होण्यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते. 1997 ते 2012 या काळात ते तीन टर्म शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे रमेश लटके या मतदारसंघात जवळपास गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सक्रिय होते.
बातम्या आणखी आहेत...