आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋतुजा लटकेंचा दणदणीत विजय:अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत 53,471 मतांनी मिळवला विजय, NOTA दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई23 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
महापालिकेच्या गुंदवली शाळेत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. - Divya Marathi
महापालिकेच्या गुंदवली शाळेत मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्यावहिल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरेंची मशाल धगधगली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी 53471 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

इतर उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मते

या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मतं मिळाली आहेत. त्यांच्यानंतर सर्वाधिक 12776 मते नोटाला मिळाली आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेले अपक्ष उमेदवार बाळा नडार यांना केवळ 1506 मते मिळाली आहेत. विशेष अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाकडून लटके यांच्या विजयाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

पहिल्या फेरीचा निकाल

 • मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ऋतुजा लटके यांना सर्वाधिक 4277 मते मिळाली आहेत
 • ऋतुजा लटके यांच्यानंतर नोटाला सर्वाधक 622 मते मिळाली आहेत.
 • राईट टू रिकॉल पार्टीचे उमेदवार मनोज नायक यांना 56 मते, बाला नाडार यांना 222 मते, मीना खेडेकवर यांना 138 मते, फरहान सय्यद यांना 103 मते, मिलिंद कांबळे यांना 79 मते, राजेश त्रिपाठी यांना 127 मते मिळाली आहेत.

दुसरी फेरी

 • दुसऱ्या फेरीअखेर 7817 मतांसह ऋतुजा लटके यांची आघाडी कायम आहे.
 • ऋतुजा लटके यांच्यानंतर नोटाला सर्वाधिक मते मिळाली आहे. दुसऱ्या फेरीअखेर नोटाला 1470 मते मिळाली आहेत.
 • नोटारनंतर बाळा नाडर यांना 339 मते मिळाली आहेत.

तिस-या फेरीचा निकाल

 • ऋतुजा लटके - 11361
 • बाळा नडार - 432
 • मनोज नाईक - 207
 • मीना खेडेकर - 281
 • फरहान सय्यद - 232
 • मिलिंद कांबळे - 202
 • राजेश त्रिपाठी - 410
 • नोटा - 2967

चौथ्या फेरीअखेर निकाल

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या चौथ्या फेरीचे निकाल जाहीर आले आहे. चौथ्या फेरीतही ऋतुजा लटके 14648 मतांसह आघाडीवर आहेत. मात्र, तिस-या फेरीतील मतांपेक्षा चौथ्या फेरीत ऋतुजा लटकेंची 257 मते घटली आहेत. अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मते मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नोटाला 3580 मते मिळाली आहेत.

 • ऋतुजा लटके - 14648
 • बाळा नडार - 505
 • मनोज नाईक - 332
 • मीना खेडेकर - 437
 • फरहान सय्यद - 308
 • मिलिंद कांबळे - 246
 • राजेश त्रिपाठी - 492
 • नोटा - 3580

पाचव्या फेरीचा निकाल

 • ऋतुजा लटके - 17278
 • बाळा नडार - 570
 • मनोज नाईक - 365
 • मीना खेडेकर - 516
 • फरहान सय्यद - 378
 • मिलिंद कांबळे - 267
 • राजेश त्रिपाठी - 538
 • नोटा - 3859

सहाव्या फेरीअखेर निकाल

 • ऋतुजा लटके - 21090
 • बाळा नाडार -674
 • मनोज नाईक - 398
 • मीना खेडेकर - 587
 • फरहान सय्यद - 448
 • मिलिंद कांबळे - 291
 • राजेश त्रिपाठी - 621
 • नोटा - 4338

सातव्या फेरीचा निकाल

 • ऋतुजा लटके -24955
 • बाळा नाडार -733
 • मनोज नाईक - 416
 • मीना खेडेकर - 646
 • फरहान सय्यद - 545
 • मिलिंद कांबळे - 312
 • राजेश त्रिपाठी - 679
 • नोटा - 4712

आठव्या फेरीचा निकाल

 • ऋतुजा लटके -29033
 • बाळा नाडार -819
 • मनोज नाईक - 458
 • मीना खेडेकर - 789
 • फरहान सय्यद - 628
 • मिलिंद कांबळे - 358
 • राजेश त्रिपाठी - 787
 • नोटा - 5655

नवव्या फेरीचा निकाल

 • ऋतुजा लटके -32515
 • बाळा नाडार -897
 • मनोज नाईक - 543
 • मीना खेडेकर - 863
 • फरहान सय्यद - 667
 • मिलिंद कांबळे - 409
 • राजेश त्रिपाठी - 889
 • नोटा - 6637

दहाव्या फेरीचा निकाल

 • ऋतुजा लटके -37469
 • बाळा नाडार -975
 • मनोज नाईक - 584
 • मीना खेडेकर - 898
 • फरहान सय्यद - 720
 • मिलिंद कांबळे - 428
 • राजेश त्रिपाठी - 986
 • नोटा - 7556

अकराव्या फेरीचा निकाल

 • ऋतुजा लटके -42343
 • बाळा नाडार -1052
 • मनोज नाईक - 622
 • मीना खेडेकर - 948
 • फरहान सय्यद - 753
 • मिलिंद कांबळे - 455
 • राजेश त्रिपाठी - 1067
 • नोटा - 8379

बाराव्या फेरीचा निकाल

 • ऋतुजा लटके -45218
 • बाळा नाडार -1109
 • मनोज नाईक - 658
 • मीना खेडेकर - 1083
 • फरहान सय्यद - 819
 • मिलिंद कांबळे - 479
 • राजेश त्रिपाठी - 1149
 • नोटा - 8887

तेराव्या फेरीचा निकाल

 • ऋतुजा लटके -48015
 • बाळा नाडार -1151
 • मनोज नाईक - 708
 • मीना खेडेकर - 1156
 • फरहान सय्यद - 859
 • मिलिंद कांबळे - 499
 • राजेश त्रिपाठी - 1211
 • नोटा - 9547

चौदाव्या फेरीचा निकाल

 • ऋतुजा लटके -52507
 • बाळा नाडार -1240
 • मनोज नाईक - 748
 • मीना खेडेकर - 1190
 • फरहान सय्यद - 897
 • मिलिंद कांबळे - 519
 • राजेश त्रिपाठी - 1291
 • नोटा - 10284

पंधराव्या फेरीचा निकाल

 • ऋतुजा लटके -55946
 • बाळा नाडार -1286
 • मनोज नाईक - 785
 • मीना खेडेकर - 1276
 • फरहान सय्यद - 932
 • मिलिंद कांबळे - 546
 • राजेश त्रिपाठी - 1330
 • नोटा - 10906

अठराव्या फेरीचा निकाल

 • ऋतुजा लटके - 65335
 • बाळा नाडार - 1485
 • मनोज नायक - 875
 • मीना खेडेकर - 1489
 • फरहान सय्यद - 1058
 • मिलिंद कांबळे - 606
 • राजेश त्रिपाठी - 1550
 • नोटा - 12691

लटकेंसमोर आव्हान नाही

निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास पक्का मानला जातोय. कारण त्यांच्याविरोधात उभे टाकलेले भाजपचे मुरजी पटेल यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज पूर्वीच मागे घेतलाय. निवडणुकीच्या रिंगणात एकूण सात उमेदवार होते. पैकी 4 अपक्ष, राइट टू रिकाॅल व पीपल्स पार्टीचा प्रत्येकी एक उमेदवार होता. ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या एकमेव राष्ट्रीय स्तरावरील पक्षाच्या उमेदवार होत्या. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसे या बड्या सर्व पक्षांनी उमेदवार दिला नव्हता.

'नोटा'ला मोठ्या संख्येने मते पडण्याची शक्यता

अंधेरी पूर्व विधानसभा मतदान क्षेत्रात २ लाख ७१ हजार इतके मतदार पात्र होते. पैकी यंदा अवघ्या ३१.७४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यात भाजपने नोटाचा प्रचार केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्यामुळे येथे ‘नोटा’ (कुणी पसंत नाही) ला मोठ्या संख्येने मते पडण्याची शक्यता आहे. ‘नोटा’ अधिक असूनही सर्वाधिक मते घेणारा उमेदवार विजयी होतो. प्रथम क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारापेक्षा ‘नोटा’ला अधिक मते पडल्यास निवडणूक रद्द होत नाही किंवा फेरनिवडणूक घेण्यात येत नाही. सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार विजयी घोषित केला जातो, असे महाराष्ट्र निवडणूक मुख्याधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

एकूण 19 फेऱ्या होणार

सकाळी ८ वाजेपासून टपाली मतपत्रिकांच्या गणनेने मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच 8:30 वाज़ता 'ईव्हीएम' यंत्रातील मतांच्या गणनेस सुरुवात होणार आहे. टपाली मतपत्रिकांच्या गणनेसाठी एक मेज (Table) असणार असून, 'ईव्हीएम' आधारित मतमोजणीसाठी 14 टेबल असणार आहेत.‌ मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीअंती मतगणनेची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे व मतमोजणी केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या 'एलसीडी स्क्रीन' वर देखील दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

चोख बंदोबस्त तैनात

कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबई पोलिस दलाचे 300 अधिकारी व कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणाही कर्तव्यावर तैनात असणार आहेत. तसेच 20 सूक्ष्मस्तरीय निरीक्षक मतमोजणीवर लक्ष ठेवून असणार आहे. मतमोजणीसाठी 200 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...