आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंसाठी शुभवार्ता:अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; लटकेंचा विजय जवळपास निश्चित

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उपनगर जिल्ह्यातील '१६६ अंधेरी पूर्व' मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या सकाळी आठपासून मतमोजणी सुरू होणार आहे. त्यासाठी महापालिकेची गुंदवली शाळा सज्ज आहे.

निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास पक्का मानला जातोय. कारण त्यांच्याविरोधात उभे टाकलेले भाजपचे मुरजी पटेल यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज पूर्वीच मागे घेतलाय. सध्या एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, लटके

एकूण १९ फेऱ्या होणार

सकाळी ८ वाजता टपाली मतपत्रिकांच्या गणनेने मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच ८:३० वाज़ता 'ईव्हीएम' यंत्रातील मतांच्या गणनेस सुरुवात होणार आहे. टपाली मतपत्रिकांच्या गणनेसाठी एक मेज (Table) असणार असून, 'ईव्हीएम' आधारित मतमोजणीसाठी १४ मेज असणार आहेत.‌ मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीअंती मतगणनेची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे व मतमोजणी केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या 'एलसीडी स्क्रीन' वर देखील दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

तब्बल २०० कर्मचारी

पाटील म्हणाले की, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार मतमोजणीच्या अनुषंगाने विविध स्तरीय बाबींचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार व्यवस्थापन व प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येत आहे. मतमोजणीसाठी २०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

चोख बंदोबस्त तैनात

कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबई पोलिस दलाचे ३०० अधिकारी व कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणाही कर्तव्यावर तैनात असणार आहेत. तसेच २० सूक्ष्मस्तरीय निरीक्षक या मतमोजणीस हजेरी लावणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेत सहभाग नोंदविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे. मतमोजणी प्रक्रियेला निवडणुकीसाठी उभे असणाऱ्या उमेदवारांचे अधिकृत व नोंदणी झालेले प्रतिनिधी देखील उपस्थित असतात. या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या प्रत्येक उमेदवाराला आपले प्रतिनिधी म्हणून १५ व्यक्तींना नेमता येते.

बातम्या आणखी आहेत...