आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून चाकूने 48 वार:जुहूमध्ये निर्घृण खून; आरोपींनी मृतदेह बॅगेत टाकला, ट्रेनमधून प्रवास करत विल्हेवाट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंधेरी येथून अपहरण केलेल्या 15 वर्षांच्या शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिच्यावर चाकूने 48 वार केल्याचे समोर आले आहे. वसई स्टेशन परिसरातील रेल्वे पुलाखाली या मुलीचा मृतदेह बॅगेत आढळून आला आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या प्रियकरासह एका आरोपीला गुजरातमधून ताब्यात घेत त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

मृत मुलीचा प्रियकर संतोष मकवाना (वय 21) आणि विशाल अंभवणे (वय 21) या दोघांनी तिच्यावर अत्याचार करत तिची निर्घृण हत्या केली. यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून एका बॅगमध्ये ठेवला. हा मृतदेह घेऊन रेल्वेने जवळपास 10 स्थानके त्यांनी ओलांडली. यानंतर मृतदेह नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात फेकून दिला.

अशी पटली ओळख

नायगाव रेल्वे स्थानकाजवळील फुटपाथवर एक संशयित बॅग पोलिसांना सापडली होती. या बॅगेची तपासणी केल्यानंतर पोलिसांना एका 15 वर्षीय मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आला. तिच्या अंगावर 12 हून अधिक ठिकाणी वार केल्याचे प्रथम दर्शनी पोलिसांना आढळून आले. तिच्या अंगावर शाळेच्या युनिफॉर्मसह आयडी कार्ड आढळून आले. यातून पोलिसांनी तिची ओळख पटली. शाळेत चौकशी केल्यानंतर ती मुलगी गुरुवारी सायंकाळपासून मिसिंग असल्याचे उघडकीस आले.

प्रेयसीच्या आईने रागावले

आरोपींनी कुणाला ओळखू येऊ नये म्हणून मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर कटिंग केली होती. त्यानंतर ते गुजरातला पसार झाले. पोलिसांनी अटक केल्यावर त्या दोघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. प्रेयसीच्या आईने रागावल्याचा राग मनात ठेवत तिच्या हत्येचा कट त्यांनी रचला आणि मित्राच्या सोबतीने तिच्यावर अत्याचार करत तिची निर्घृण हत्या केल्याचे सांगितले.

प्रियकरावर आधीही गुन्हे

मृत मुलीच्या कुटुुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या प्रियकरावर मुलींची छेड काढल्याप्रकरणी आधीच काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील बाकी आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी याप्रकरणी लक्ष घालत आरोपीने केलेल्या बाकी गुन्ह्याची चौकशी व्हावी, अशी मागणी मृत मुलीच्या घरच्यांनी केली आहे. आरोपी सध्या कोठडीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...