आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रविण दरेकरांचा खोचक सवाल:​​​​​​​राठोडांची पाठराखण केली नाही, पण अनिल देशमुखांमागे संजय राऊत भक्कमपणे उभे; राऊत शिवसेनेचे प्रवक्ते की, राष्ट्रवादीचे?

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊत यांनी केलेली वक्तव्य हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखे केल्याचे दिसून येतेय

अँटिलिया प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. या प्रकरणानंतर अनेक खळबळजनक गोष्टी समोर आल्यामुळे राज्य सरकार आणि विरोधीपक्षांमध्ये खडाजंगी सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान अनिल देशमुखांवरही गंभीर आरोप झाल्याने विरोधीपक्षाने राज्य सरकारला धारेवर धरले आहे. विरोधीपक्षाला योग्य उत्तरे देण्याचे काम सत्ताधारी नेते करत आहेत. यावरुनच विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकरांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

'संजय राऊत यांनी केलेली वक्तव्य हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखे केल्याचे दिसून येतेय. आपल्या पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा (संजय राठोड) घेतला जातो आणि तेव्हा संजय राऊत काहीही बोलत नाहीत. मात्र राष्ट्रवादीची पाठराखण अत्यंत इमानदारीने केली जात आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की, राष्ट्रवादीचे?'अशा शब्दांमध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

'संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून केले आहे का? अशी शंका निश्चितपणे मला येते आहे. कारण ज्या वेळेला संजय राठोड त्या पक्षाचे नेते ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, बंजारा समाज त्या ठिकाणी शिवसेनेच्या मागे उभे केला. त्यांनी केलेले कृत्य अयोग्य आहे, त्या विषयी दुमत असण्याची काहीच कारण नाही. मात्र त्यावेळेला चौकशीसाठी राजीनामा आवश्यक वाटला, म्हणजे आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आपल्या पक्षाचा नेता, त्याचा राजीनामा घेण्यात येतो. तेव्हा संजय राऊत याचे वक्तव्य येत नाही, की चौकशीसाठी राजीनाम्याची आवश्यकता नाही म्हणून, मग तेवहा त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का? की कशासाठी माहिती नाही. मात्र त्याचवेळेला शिवसेनेच्या नेत्याची, कार्यकर्त्याची, पाठराखण करायला विसर पडलेले संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसची भलामन पाठराखण अत्यंत इमानदारीने करताना दिसत आहेत. म्हणून अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी राजीनाम्याची आवश्यकता नाही, असा निर्वाळा देताना संजय राऊत या ठिकाणी दिसतात.'

बातम्या आणखी आहेत...