आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांनी पवारांचा दावा खोडला:15 फेब्रुवारीला सुरक्षारक्षकांसह, माध्यमांसमोर पत्रकार परिषद मात्र झाली होती, 'हे' देशमुख नेमके कोण?, देवेंद्र फडणवीसांचा पवारांना खोचक सवाल

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पवारांनी दावा केला होता की, वाझे आणि देशमुखांची भेट झालीच नाही

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण करत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. परमबीर सिंहांनी अनिल देशमुखांवर लावलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे पवार म्हणाले. 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र यानंतर तत्काळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पवारांचा हा दावा खोडून काढत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी देशमुख यांनी 15 तारखेला घेतलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओच शेअर केला आहे.

फडणवीसांनी ट्विट करत पवारांचा दावा खोडून काढला

परमबीर सिंहांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप लावल्यानंतर भाजपकडून सातत्याने देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यानंतर शरद पवारांनी देशमुखांची पाठराखण करत सर्व आरोप फेटाळले होते. दरम्यान आता फडणवीसांनी ट्विट करत पवारांचा दावा खोडून काढला आहे. त्यांनी देशमुखांचा 15 फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर केला. 'देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?', असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

पवारांनी दावा केला होता की, वाझे आणि देशमुखांची भेट झालीच नाही
शरद पवारांनी स्पष्टीकरण देत अनिल देशमुख हे आरोप करण्यात आले त्या काळात रुग्णालयात असल्याचेही म्हटले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख या काळात रुग्णालयामध्ये होते असे कागदपत्रंही त्यांनी सादर केले. सिंह यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. मी रुग्णालयामधून ही माहिती घेतली आहे. देशमुख रुग्णालयामध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड असल्याचेही देशमुख म्हणाले. तसेच 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाइन राहण्याचा सल्ला डॉक्टरांचा होता. असे असुनही सिंह कोणत्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचे सांगत आहेत? असा सवालही पवारांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...