आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगी:अनिल देशमुख यांना नागपूर, नवी दिल्लीस जाण्याची मुभा, विशेष न्यायालयाची 4 आठवड्यांसाठी परवानगी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशांच्या अवैध व्यवहारप्रकरणी जामिनावर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष न्यायालयाने त्यांच्या गावी नागपूर आणि नवी दिल्लीस जाण्याची मुभा दिली आहे. मात्र ही परवानगी केवळ ४ आठवड्यांपुरतीच मर्यादित आहे. देशमुख यांच्याविरोधातआय) चाैकशी सुरू आहे. सध्या ते जामिनावर आहेत. ईडी आणि सीबीअायच्या विशेष न्यायालयांनी त्यांना सशर्त जामीन दिला होता.त्यानुसार त्यांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई होती. त्यामुळे त्यांनी अॅड.अनिकेत निकम आणि अॅड. इंदरपाल सिंग यांच्यामार्फत दोन स्वतंत्र याचिका दाखल करुन परवानगी मागितली होती. नागपूर हे अापले गाव असून त्या ठिकाणाहून दोन वेळा निवडून अालो अाहे. तसेच खटल्यासंबंधी वकिलांशी चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीलाही जायचे असल्याचे देशमुख यांनी याचिकेत म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...