आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Anil Deshmukh And Nawab Malik Highcourt Vote For Vidhan Sabha Election | Petition For The Right To Vote In The Legislative Council Elections

अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची हायकोर्टात धाव:विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी याचिका

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचे हक्क मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी राज्यसभेत मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी मलिक आणि देशमुख यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, राज्यसभा निवडणुकीत त्यांना मतदान करता आले नाही. त्यानंतर आता विधान परिषदेसाठी मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मलिक आणि देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

15 जून रोजी सुनावणी

मनी लाँड्रिंग प्रकरणात महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख सध्या कोठडीत आहेत. येत्या 20 जूनला विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी या दोघांनी न्यायालयात धाव घेतली असून, त्यांच्या याचिकेवर 15 जून रोजी सुनावणी होणार आहे. तसेच मलिकांच्या सुधारित याचिका दाखल करण्याच्या परवानगीबाबत देखील थोड्याच वेळात निर्णय होणार आहे.

कैद्यांना अधिकार नाही

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी राज्यसभेसाठी मतदानाची परवानगी मिळावी अशी याचिका कोर्टात केली होती. मात्र, त्यांच्या या अर्जाला ईडीने विरोध दर्शविला होता. ईडीच्या या विरोधी भूमिकेमुळे चिंतेचे वाचावरण निर्माण झाले होते. कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असे स्पष्ट करत ईडीने लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलम 62 नुसार हा एक औपचारीक अधिकार आहे, त्यामुळे तो मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या या दोन्ही आमदारांना मतदानाची परवानगी देण्यात येऊ नये, असे ईडीने कोर्टात दाखल केलेल्या आपल्या उत्तरात स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...