आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Anil Deshmukh And Nawab Malik Rajyasabha Election Update | ED Opposes Interim Bail Application Of Anil Deshmukh And Nawab Malik Before Rajya Sabha Elections

देशमुख, मलिकांना मतदानाचा अधिकार नाही:राज्यसभा निवडणुकीपूर्वीच्या तात्पुरत्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध, विशेष कोर्टाने निकाल राखून ठेवला

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे बिनखात्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनाला अंमलबजावणी संचालनालयाने ​​​​​विरोध केला. या दोघांनीही राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक दिवसाच्या तात्पुरत्या जामिनाची मागणी केली. मात्र, कैद्यांना प्रतिनिधीद्वारे मतदान करण्याचा अधिकार नसल्याची भूमिका ईडीने विशेष न्यायालयापुढे मांडली असून या प्रकरणात विशेष न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

मतांसाठी जुळवाजुळव सुरू

राज्यसभा निवडणुकीसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी देशमुख, मलिकांना मतदानाचा अधिकार मिळावा, अशी महाविकास आघाडीची मागणीय. कारण शिवसेनेने देखील आपला दुसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा केला असून, त्यासाठी सध्या शिवसेना मतांची जुळवाजुळव करत आहे. अशातच ईडीने तुरुंगात असलेले अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे.

न्यायालयात म्हटले की...

मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये सध्या देशमुख आणि मलिक हे राष्ट्रवादीचे दोन्ही नेते तुरुंगात आहेत. त्यांनी निवडणुकीत मतदान करण्यासाठी गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयात तात्पुरता जामीन केला होता. ईडीने आपल्या जबाबात विशेष न्यायालयाला म्हटले आहे की, देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल असून, ते गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून तुरुंगात होते, सध्या ते न्यायालयीन कोठडीत असल्याचे ईडीने सांगितले आहे.

कायद्याचा हवाला दिला

दोन्ही नेत्यांच्या अर्जावर ईडीने कायद्याचा हवाला देत त्यांना मतदानाला बाहेर जाता येणार नसल्याचे म्हटले आहे. ईडीने 1951 कलम 62(5) चा हवाला दिला आहे. 'जर एखादा व्यक्ती जेलमध्ये असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही निवडणुकीत मतदान करता येणार नाही, या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, असे ईडीने म्हटले आहे.

सुनावणी सुरू

ईडीने दिलेल्या माहितीनूसार, अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा गैरवापर केला आहे. तसेच त्यांनी काही पोलिसांच्या माध्यमांतून मुंबईतील बारचालकांकडून 4.70 कोटी रुपये जमा केले होते. तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबधित जमीन खरेदी केल्याप्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी मलिकांना देखील मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी अटक केली होती. राज्यसभेच्या मतदानासाठी जामीन मिळावा या मागणीची याचिका देशमुख आणि मलिकांनी न्यायालयात दाखल केली आहे. सध्या त्यांच्या या अर्जावर सुनावणी सुरू आहे.

सहाव्या जागेसाठी लढत

तब्बल दोन दशकांनंतर राज्यात राज्यसभेची निवडणूक होणार असल्याने सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सत्ताधारी शिवसेनेने दोन उमेदवार उभे केले आहेत, तर सरकारमध्ये असलेल्या मित्रपक्षांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने प्रत्येकी एक, तर विरोधी भाजपने तीन उमेदवार उभे केले आहेत. सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनीही कंबर कसली आहे.

बातम्या आणखी आहेत...