आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटी वसूलीच्या आरोप प्रकरणी राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सीबीआय पंधरा दिवसांच्या आत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही वेळेतच देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला होता. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) येत्या आठवड्यात अनिल देशमुख यांची चौकशी करु शकते. कारण त्यांना पंधरा दिवसाच्या आत आपला अवहाल उच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे. त्यामुळे सीबीआय आता अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता माध्यम समुहात वर्तवली जात आहे.
गेल्या रविवारी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थात सीबीआयने देशमुख यांच्या दोन वैयक्तिक सहाय्यकाची (पीए) आठ तास चौकशी केली होती. यापूर्वी सीबीआयने अँटिलिया प्रकरणाचा मुख्य सुत्रधार सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि वाझेच्या दोन गाडी चालकांची चौकशी केली आहे.
केंद्रीय अन्वेषण ब्यूरो या प्रकरणाची सतत चौकशी करीत आहे. दुसरीकडे सीबीआयने एका कल्ब मालकाची चौकशी केली असून तो कल्ब सचिन वाझे यांचा आर्थिक व्यवहारांचा महत्वाचा अड्डा असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रनेच्या तपासणीतून समोर आले आहे.
वाझेच्या सीक्रेट डायरीची चौकशी सुरु
सीबीआयलाच्या माहितीनुसार, सचिन वाझे वसूली प्रकरणाची संपूर्ण नोंद आपल्या डायरीमध्ये करुन ठेवायचा. त्या डायरीमध्ये मुंबईमधील प्रमुख हॉटेल, बार आणि पबचे नाव असून कोणाला किती रक्कम द्यायची हे ठरलेले होते. यामधील व्यवहार हे रोकड स्वरुपात नमूद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.