आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख खुर्ची सोडल्यानंतर रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली. आज सिंघवीच्या माध्यमातून ते सीबीआय चौकशीच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिले होते.
अभिषेक दुलार यांच्या नेतृत्वात CBI चे पथक आज मुंबईला पोहचेल
कोर्टाच्या आदेशानंतर CBI चे एक पथक लवकरच मुंबईत पोहोचणार आहे. या संघाचे नेतृत्व हिमाचल प्रदेश केडरचे 2006 बॅचचे IPS अधिकारी अभिषेक दुलार हे करत आहेत. पथक सर्वप्रथम परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवणार असल्याची शक्यता आहे. आयआयटी दिल्ली येथून इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी केलेल्या दुलार यांनी राज्य दक्षता आणि अँटी करप्शन ब्यूरोची जबाबदारी सांभाळली आहे. ते शिमला, मंडी आणि कुल्लूचे पोलिस अधीक्षक राहिले आहेत. विजलेंस डिपार्टमेंटमधील त्यांचे काम पाहून त्यांना या प्रकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
परमबीर सिंहांना द्यावी लागतील या 10 प्रश्नांची उत्तरे
CBI ची टीम सर्वात पहिले देशमुखांवर 100 कोटींच्या वसूलीचा आरोप लावणाऱ्या परमबीर सिंहांचा जबाब नोंदवेल. अधिकारी परमबीर सिंहांना हे 10 प्रश्न विचारू शकते.
दिलीप वळसे पाटील आज पदभार स्वीकारतील
अनिल देशमुख यांच्या जागी दिलीप वळसे पाटील आता राज्याचे नवे गृहमंत्री असतील. ते लवकरच गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारतील. सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून देशमुख यांचा राजीनामा मंजूर करण्याची शिफारस केली होती, त्यास राज्यपालांनी मान्यता दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.