आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहमंत्र्यांवरील वसुलीचा आरोप:ED ने कोर्टात म्हटले - अनिल देशमुखांना बार मालकांकडून मिळाले 4 कोटी, त्यांनी ही रक्कम आपल्या ट्रस्टमध्ये पोहोचवली

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इडीने शनिवारी देशमुखांचे पीए संजीव पलांडे आणि पीएस कुंदन शिंदेंना कोर्टात हजर केले.

100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी एक मोठा खुलासा झाला आहे. देशमुख यांना बार मालकांकडून चार कोटी रुपये मिळाले होते, असे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोर्टाला सांगितले आहे. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून देणगीच्या स्वरूपात त्यांनी ही रक्कम त्यांच्या ट्रस्टकडे ट्रान्सफर केली.

इडीने शनिवारी देशमुखांचे पीए संजीव पलांडे आणि पीएस कुंदन शिंदेंना कोर्टात हजर केले. यावेळी ईडीने हा दावा न्यायालयात उपस्थित केला. शुक्रवारी रात्री उशिरा दोघांनाही ईडीने अटक केली. हे दोघे 1 जुलैपर्यंत ईडीच्या रिमांडवर आहेत. त्यांच्यावर देशमुखांना पैशाच्या गैरव्यवहारात मदत केल्याचा आरोप आहे. शनिवारी चौकशी एजन्सीने देशमुख यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. परंतु देशमुख यांनी हजर होण्यासाठी नवीन तारीखेची मागणी केली आहे.

हे प्रकरण देशमुख यांच्यावरील वसुलीच्या आरोपांशी संबंधित आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुमारे अडीच महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे अनिल देशमुख यांनी निलंबित मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणामध्ये ईडीच्या पथकाने जवळपास 10 ते 12 बार मालकांचे जबाबही नोंदवले आहे. यानंतर तळोजा तुरुंगात जाऊन बरखास्त पोलिस अधिकारी सचिन वाझेचाही जबाब दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...