आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटींच्या वसुलीचा आरोप:अनिल देशमुखांविरोधात दाखल FIR संबंधी राज्य सरकारच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आता 8 जून रोजी होणार सुनावणी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळवारी देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या घरी ED चा छापा

मुंबईचे माजी पोलिस कमिश्नर परमबीर सिंह यांच्याद्वारे लावण्यात आलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपाचा सामना करत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविषयी मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आता 8 जूनला सुनावणी होणार आहे. या याचिकेमध्ये राज्य सरकारकडून देशमुखांच्या विरोधात दाखल FIR चे 2 परिच्छेद हटवणे आणि त्याविरोधात CBI द्वारे करण्यात आलेल्या कारवाईवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. याचिकेमध्ये हे देखील आरोप करण्यात आले होते की, CBI उच्च न्यायालयाद्वारे दिल्या गेलेल्या निर्देशांचे उल्लंघन करत आहे.

CBI ने या दोन परिच्छेदांमध्ये गेल्यावर्षी कोरोना संकट काळादरम्यान निलंबित API ची बहाली आणि गेल्या वर्षी कोरोना संकटाच्या वेळी काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचा उल्लेख केला होता. या बाबत राज्य सरकारला आपत्ती आहे. याचिकेमध्ये राज्य सरकारकडून म्हटले आहे की, न्यायालयाने आपल्या 5 एप्रिलच्या आदेशांमध्ये परमबीर सिंहांच्या आरोपांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. वाझेंची बहाली आणि ट्रान्सफर प्रकरणात कोर्टाने कोणतीही टिप्पणी केलेली नव्हती. यानंतर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत देशमुखांच्या विरोधात कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत.

गृह विभागाला CBI च्या या मुद्द्यांवरही आहे आपत्ती
गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या माध्यमातून राज्य सरकारद्वारे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, CBI सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहे, ज्यामध्ये देशमुखांविरोधात विना FIR ची तपासणी करण्याचे म्हटले होते. याचिकेत असेही म्हटले आहे की, देशातील अशी काही राज्ये आहेत ज्यात सीबीआय राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कोणताही तपास करू शकत नाही. या प्रकरणात सीबीआयने राज्य सरकारची परवानगी न घेता या प्रकरणांची चौकशी केली आहे. सीबीआयने दिल्ली विशेष पोलिस आस्थापना कायद्यातील कलम 6 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे याचिकेत नमूद केले आहे.

मंगळवारी देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या घरी ED चा छापा
याआधी मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शिवाजीनगरमध्ये महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय असलेल्या सागर भाटेवार यांच्या घरावर छापा टाकला. सागर यांना देशमुखचा व्यवसाय भागीदार म्हटले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ED ची टीम मंगळवारी सकाळी 9.30 च्या सुमारास सागरच्या घरी पोहोचली आणि शोध घेतला. मात्र टीमच्या सदस्यांनी हे देखील सांगितलेले नाही की, तपासादरम्यान कोणती कागदपत्रे मिळाली आहेत, मात्र सूत्रांचा दावा आहे की, अनेक प्रकारची कागदपत्रे ED च्या टीने आपल्या सोबत नेली आहेत.

CBI ने यापूर्वीही केली आहे छापेमारी
यापूर्वी मार्च महिन्यात CBI ने देशमुखांच्या नागपूर आणि मुंबई येथील घर आणि इतर ठिकाणांवर छापेमारी केली आहे. CBI च्या FIR च्या आधारावरच ED नेही देशमुखांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग अनुसार ECIR दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...