आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटिलिया प्रकरण:महाराष्ट्राचे गृहमंत्री देशमुख यांनी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र; सत्य समोर येण्यासाठी माजी आयुक्तांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावरील आरोपांचे सत्य समोर येण्यासाठी माजी आयुक्तांची चौकशीची मागणी केली

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावरील आरोपाची चौकशी व्हावी याकरीता खुद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. पत्रात म्हटलेले आहे की, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आण‍ि डीजी होमगार्ड परमबीर सिंह यांनी माझ्यावर सचिन वाझेकडून दरमहिना 100 कोटी रुपये वसूली करण्याचा आरोप केला होता. या आरोपात तथ्य नसून सत्य समोर येण्यासाठी माजी पोलिस आयुक्तांची चौकशी करावी असे मागणीचे पत्र देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले आहे. त्यांनी हे पत्र रात्री आपल्या सोशल मीडिया हँडलवरून प्रसारित केले.

पत्रात पुढे म्हटले आहे की, जर मुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले तर मी त्यांचे स्वागत करेन. जेणेकरुन यामाध्यमातून 'दुधाचे दूध आण‍ि पाण्याचे पाणी' होण्यास मदत मिळेल. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना 17 मार्च 2021 रोजी आपल्या पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी गृहमंत्र्यांवर वसुलीचे आरोप केले होते. यामुळे गृहमंत्री देशमुख यांनी चौकशीचे मागणी करण्यासाठी मुख्यमंत्रांना पत्र लिहले आहे.

भाजपकडून सतत हल्ला
अँटिलिया प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. यावरून विरोधी पक्ष भाजप सत्ताधाऱ्यांवर सतत हल्ला करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. बुधवारी भाजपच्या एका शिष्टमंडळांने राज्यपालाची भेट घेत शंभर प्रश्नांची यादी सोपवली. राज्यात सध्याच्या परिस्थितीचे रिपोर्ट राष्ट्रपतींकडे पाठवण्याची मागणीदेखील केली.

परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात लावले होते हे आरोप
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आपल्या बदलीच्या प्रक्रियेवरुन गृहमंत्री देशमुख यांच्यावर मोठे गौप्यस्फोट केले होते. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, माझी बदली ही महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 22 एन (2) अन्वये केली गेली. ज्यामध्ये प्रशासन स्तरावर हे अत्यंत महत्वाचे आहे, असे कारण दाखवले गेले होते. पत्रानुसार, गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझेला अनेकवेळा आपल्या घरी भेटण्यासाठी बोलावले होते. त्यात त्यांना महिना शंभर कोटी रुपये वसूली गोळा करण्याचे सांगितले होते.

आज महाविकास आघाडीचे नेते घेणार राज्यपालांची भेट
महाविकास आघाडीचे नेते आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृवात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असून त्यात ते आपल्या सरकारची बाजू मांडतील. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...