आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल देशमुखांना जे.जे. रुग्णालयातून डिस्चार्ज:प्रकृती खालावल्याने शुक्रवारी आर्थर रोड तुरुंगात कोसळले होते

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख शुक्रवारी आर्थर रोड तुरुंगात चक्कर येऊन कोसळले होते. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने ते कोसळल्याची माहिती समोर आली होती. सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती हाती येत आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नाव आल्याने ईडीने त्यांची चौकशी करुन त्यांना कोठडी सुनावण्यात आली होती. गेल्या 10 महिन्यांपासून ते तुरुंगात आहेत. अनिल देशमुख यांनी महाविकास आघाडीत गृहमंत्री पद भुषवलेले आहे. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अनिल देशमुख तुरुंगातच चक्कर येऊन पडले होते. यावेळी त्यांचा रक्तदाब अतिशय वाढल्याचे आढळून आले होते.

अटक झाल्यापासून त्यांना मोठ्या प्रमाणावर शारिरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. 2 महिन्यांपूर्वीही त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधी एप्रिल महिन्यात त्यांच्यावर खांद्याची शस्त्रक्रीया करण्यात आली होती. जेजेमध्येच अस्थिव्यंग विभागात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.

उपचार करुन सोडले

शुक्रवारी प्रकृती खालावल्याने ते कोसळले होते. त्यानंतर त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी 2 वाजता त्यांना रुग्मालयात आणण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करुन त्यांच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर दिवसभर त्यांना अंडर ऑबझर्व्हेशन ठेऊन सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास रुग्मालयातून सुट्टी देण्यात आली.

तुरुंगवास का?

अनिल देशमुख 10 नोव्हेंबरपासून तुरुंगात आहेत. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका आहे. त्यांनी मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट ठेवले होते. या आरोपानंतर अनिल देशमुखांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली आहे. स्पेशल पीएमपीएल कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड तुरुंगातच आहेत.

बातम्या आणखी आहेत...