आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल देशमुख ईडी प्रकरण:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खुले पत्र, 'माझे आयुष्य हे खुल्या पुस्तकासारखे, त्यात मी काहीच लपवून ठेवलेले नाही' - देशमुख

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वसुली प्रकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आज ईडी कार्यालयात हजेरी लावली. ईडी कार्यालयात जाण्यापुर्वीच त्यांनी आपला व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. त्यानंतर आता देशमुख यांनी एक पत्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. त्या पत्रात वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले आहे.

पत्रात काय म्हणाले देशमुख

मी माझे संपूर्ण आयुष्य जनतेसाठी समर्पित केले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून मी आयुष्य जगलो आहे. त्यामुळेच माझ्या खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात कोणत्याही प्रकारचे आरोप झालेले नाहीत. माझे आयुष्य हे खुल्या पुस्तकासारखे आहे. त्यात मी काहीच लपवून ठेवलेले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर काही जण आरोप करत आहे.

ज्यांची काहीच नैतिकता किंवा विश्वासहार्यता नाही अशा लोकांनी माझ्यावर आरोप केले. काही तरी हितसंबंधातून हेतूपरत्वे हे आरोप करण्यात आले आहेत. हे सर्व आरोप खोटे आहेत. ज्या व्यक्तीने हे आरोप केला, तोच कर्तव्यावर असताना खंडणी वसूल करायचा. फ्रॉड करायचा आणि खुनाच्या गुन्ह्यातही असल्याचे दिसून येते. तर माझ्यावर आरोप करणारा मुंबईचा माजी पोलीस आयुक्तच एका प्रकरणात फरार आहे. असे देशमुख म्हणाले.

पुढे पत्रात म्हटले आहे की, भारतीय नागरिक म्हणून मी नेहमीच संविधानाचे पालन करतो. संविधानाच्या अनुच्छेद 21चा मी नेहमीच आदर केला आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयात माझी याचिका सुनावणीसाठी असतानाही त्यापूर्वीच मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे. मला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिलेला आहे.

माझी चौकशी सुरू असताना माझा वकील माझ्या सोबत राहील. वकिलाच्या समक्षच माझे म्हणणे नोंदवले जाईल, तसेच जर गरज असेल तर मला अटकपूर्व जामीन देण्याचेही कोर्टाने म्हटले आहे. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले असून, यात कुणाचे तरी वेस्टेड इंट्रेस्ट आहेत. मात्र, या सर्वांकडे दुर्लक्ष करून ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे.

माझ्याविरोधात सुरू असलेला प्रचार निराधार आहे.माझ्यावर झालेले आरोप हे निराधार आहेत. हे मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे. माझी चौकशी अत्यंत निष्पक्षपातीपणे होईल अशी आशा आहे. मी चौकशीला संपूर्णपणे सहकार्य करेल, सत्यमेव जयते! असे पत्राच्या माध्यमातून अनिल देशमुख म्हणाले आहे.

बातम्या आणखी आहेत...