आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटिलिया प्रकरणाला नवीन वळण:व्हायरल कागदपत्रात गृहमंत्री देशमुख 15 फेब्रुवारी रोजी खासगी विमानाने नागपूरहून मुंबईला रवाना झाल्याचा दावा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गृहमंत्र्याची बाजू मांडताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देशमुख 6 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या काळात नागपुरात होते असे म्हटले

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे अँटिलिया प्रकरणावरून भष्ट्राचाऱ्याच्या आरोपाखाली सापडले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांच्यावर झालेल्या 100 कोटीच्या वसूलीच्या आरोपाचे खंडन करताना म्हटले की, देशमुख हे 6 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या काळात नागपुरात होते. परंतु, व्हायरल गृहमंत्र्याच्या कागदपत्रावरुन या दोन्हीमध्ये खूपच विरोधाभास आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गृहमंत्र्याना वाचवतांना पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस नवीन मोड समोर येत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या पक्षाकडून गृहमंत्री देशमुख यांची बाजू मांडली. परंतु, पवार यांनी काल केलेल्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण व्हायरल कागदपत्रात गृहमंत्र्यानी इतर सात लोकांना सोबत घेत 15 फेब्रुवारी रोजी खासगी विमानाने मुंबई गेल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पवारांची पुन्हा एकदा फसगत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे की, जर हे प्रसारित कागदपत्रे खरे असेल तर परमवीर सिंग यांनी केलेला खुलासा खरा आहे असे समजावे लागेल. त्यामुळे संबंधित प्रकरणात ते आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

व्हायरल कागदपत्रे ही नागपुरमधील सिल्व्हर जुबली ट्रॅव्हलर या कंपनीच्या नावे आहे. त्यामध्ये ऑपरेटरचे नाव व्हीएसआर व्हेंचर्स प्राइव्हेट लिमिडेट असून रवाना होण्याची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. पत्रकात विमानातील कर्णधाराचे नाव उत्पल कुंडू आणि राहुल ओबेरॉय आहे. प्रवासी यादीच्या सर्वात वर अनिल देशमुख यांचे नाव लिहिलेले आहे, त्यांच्याशिवाय इतर 7 जणांची नावेही आहेत.

ईडीकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता
अँटिलिया प्रकरण आता वेगळे वळणावर येऊन ठेपले आहे. परमीवर सिंगच्या यांच्या आरोपावरून या मनी लाँड्रिग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय या संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर ईडीने चौकशी केली तर सचिन वझेसोबतच गृहमंत्र्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून ईडी सचिन वझेची माहिती गोळा करत आहे. तर दुसरीकडे, परमवीर सिंग यांनी आपल्यावरील आरोपाच्या विरोधात सोमवारी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या माहितीनुसार, सचिन वझे मनी लाँड्रिग प्रकरणी अडचणीत येऊ शकतात. कारण त्यांच्याकडून लक्झरी वाहने, बेनामी मालमत्ता, अनेक बँक खात्याचा तपशील आण‍ि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एनआयएला त्यांच्याजवळून कोट्यवधींची संपत्ती असल्याचा संशय आला आहे.

बातम्या आणखी आहेत...