आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण:'15 तारखेला डिस्चार्ज झाल्यावर हॉस्पिटलच्या बाहेरच पत्रकारांशी बोललो', देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नाला अनिल देशमुखांचे उत्तर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेचे ट्विट शेअर करत केला होता सवाल

मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्या खळबळजनक आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी देशमुखांवरील सर्व आरोप फेटाळून लावले. 'देशमुख हे आरोप करण्यात आलेल्या काळात रुग्णालयात होते' असे पवार म्हणाले. यावर फडणीसांनी पत्रकार परिषदेचा व्हिडिओ ट्विट करत सवाल केला होता. आता यावर अनिल देशमुखांनी उत्तर दिले आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?
15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे व्हिडीओ फडणवीसांनी ट्वीट केल्यानंतर देशमुखांनी स्पष्टीकरण दिले आहे. देशमुख म्हणाले की, 'मला कोविड झाल्यामुळे मी 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या काळात नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. 15 फेब्रुवारीला माझा डिस्चार्ज झाला. त्यावेळी मी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना गेटवर काही पत्रकार होते. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते.त्यावेळी माझ्या अंगात त्राण नव्हता. मी हॉस्पिटल बाहेरच खुर्चीवर बसलो आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर मी घरी जाऊन होम क्वारंटाईन झालो. 15 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत मी होम क्वारंटाईन होतो. 28 फेब्रुवारीला मी पहिल्यांदा बाहेर पडत सह्याद्री गेस्टहाऊस येथे बैठकीला गेलो होतो' असे अनिल देशमुख म्हणाले.

काय म्हणाले होते फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांचा देशमुखांचा 15 फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर केला. 'देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?', असा सवाल फडणवीस यांनी केला होता.

काय म्हणाले होते पवार?
शरद पवारांनी स्पष्टीकरण देत अनिल देशमुख हे आरोप करण्यात आले त्या काळात रुग्णालयात असल्याचेही म्हटले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख या काळात रुग्णालयामध्ये होते असे कागदपत्रंही त्यांनी सादर केले. सिंह यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. मी रुग्णालयामधून ही माहिती घेतली आहे. देशमुख रुग्णालयामध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड असल्याचेही देशमुख म्हणाले. तसेच 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाइन राहण्याचा सल्ला डॉक्टरांचा होता. असे असुनही सिंह कोणत्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचे सांगत आहेत? असा सवालही पवारांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक आरोप पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. वाझे यांनी स्वतः येऊन आपल्याला या वसूलीच्या कथित टार्गेटची माहिती दिली असल्याचेही ते म्हणाले. एवढेच नव्हे, तर हे पैसे कुठून आणि कसे घ्यायचे याची प्लॅनिंग सुद्धा वाझेंना गृहमंत्र्यांनी दिली होती असे सिंह यांनी पत्रात म्हटले आहे. परमबीर सिंह यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...