आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फेक फॉलोअर्स:गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले - अनेक पीआर एजंसी बनवतात बॉलिवूड कलाकारांचे फेक फॉलोअर्स, चौकशीचे आदेश

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे हे बॉलिवूड कलाकार आणि आयएसआय यांच्यातील संबंधांबद्दल बोलले होते
  • अनिल देशमुख म्हणाले होते, जर ते खरे असेल तर ते आक्षेपार्ह आहे आणि या प्रकरणाची काटेकोरपणे चौकशी केली जाईल

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, अनेक पीआर एजन्सी बॉलिवूड कलाकारांसह अनेकांचे बनावट फॉलोअर्स बनवतात. हे फॉलोअर केवळ प्रसिद्धी करत नाहीत तर ट्रोल करतात आणि डेटा चोरी करण्याचेही काम करतात. ते म्हणाले की या प्रकरणाची संपूर्ण चौकशी महाराष्ट्र पोलिसांकडून केली जाईल.

बॉलिवूड अॅक्टर्सच्या आयएसआय संबंधींचा आरोप 
भाजप नेते बैजयंत जय पांडा आणि शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी काही बॉलीवूड कलाकारांवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध जोडल्याचा आरोप केल्यानंतर गृहमंत्र्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. खरंतर, ही दोन्ही प्रकरणे स्वतंत्र मानली जातात. गृहमंत्री यांनी गुरुवारी शेवाळे यांच्या आरोपांबाबत चौकशी करण्याविषयी सांगितले होते. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी सांगितले की, 'राहुल शेवाळे (मुंबईच्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार) यांनी लिहिलेल्या पत्राबद्दल आम्ही माहिती घेऊ. जर हे सत्य असेल तर आक्षेपार्ह आहे. एखाद्या प्रकारचे प्रकरण असेल तर हे खूप गंभीर आहे. जे या कामांमध्ये सामील आहे त्यांना माफ केले जाणार नाही. महाराष्ट्र पोलिस या प्रकरणाचा तपास करतील आणि ठोस पावले उचलली जातील.

काही स्टार्सचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले

दुसरीकडे भाजप नेते बैजयंत जय पांडा यांच्या सनसनाटी दाव्यानंतर सोशल मीडियावर काही फिल्मस्टार्सचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हे फिल्मी सितारे परदेशात भारतविरोधी कारवाया करणार्‍या 'पाकिस्तानी एजंट्स' सोबत दिसत आहेत. भारतविरोधी घटक बॉलिवूडमध्ये त्यांच्या प्रभावाचा वापर जम्मू-काश्मीरमधील फुटीरता आणि हिंसा भडकावण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी  करत आहे. असा दावा हे फोटो शेअर करुन करण्यात आला. 

शासनाने तीन इव्हेट कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केले 

बॉलिवूडमधील इव्हेंट मॅनेजर रेहान सिद्दीकी आणि त्याचे दोन भारतीय साथीदार मेहमान दर्शन मेहता आणि राकेश कौशल अमेरिकेत भारतविरोधी कार्यात काम करतात. यांना सरकारने काळ्या यादीत टाकले आहे. बॉलिवूड कलाकार त्यांच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत. बॉलिवूड कलाकारांसमवेत कार्यक्रम आयोजित करून हे पैसे भारतविरोधी कामांवर खर्च करायचे असा आरोप आहे.