आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत मृत्यू प्रकरण:सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर अनिल देशमुख म्हणतात - निकालाची प्रत हातात आल्यावर त्यावर अभ्यास करुन प्रतिक्रिया देऊ

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. आतापर्यंत जमा करण्यात आलेले पुरावेसीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी या तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहे. आता यानंतर अनिल देशमुख यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मीडियाने प्रश्न विचारले. यावेळी निकालाची प्रत हातात आली नसल्याचे म्हटले. अनिल देशमुख म्हणाले की, 'सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला हे ठिकंय. पण आम्हाला अजूनही निकालाची प्रत मिळालेली नाही. प्रत मिळाल्यानंतर त्यामध्ये काय लिहिले आहे याचा अभ्यास करुन आम्ही यावर प्रतिक्रिया देऊ.'

गेल्या काही दिवसांपासून अनेकांकडून सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. सुशांतच्या कुटुंबियांचीही तिच मागणी होती. मात्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी ही मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर, आज सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर भाजपकडून अनिल देशमुखांवर निशाणा साधण्यात आला आहे.

माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले. 'महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलिस कमिश्नरांनी 2 महिने एफ आय आर न घेणे दुर्देवी आहे. सुशांत सिंग चा परिवार ला न्याय मिळेल' असे ट्विट त्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...