आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलाकारांच्या चौकशीवर गृहमंत्री:माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आला, लतादिदी हे आमचे दैवत; गृहमंत्री अनिल देशमुखांचे कलाकारांच्या चौकशीवर स्पष्टीकरण

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाराणे-आठाण्यात वाट्टेल त्या अफवा पसरवणाऱ्यांनो कायदे कडक आहेत

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केले होते यानंतर देशभरात एकच चर्चा सुरु झाली. यावरुन अनेक खेळाडू तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत आहे. तसे होऊ देऊ नका असे आवाहन केले होते. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. आता यावर गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्पष्टीकरण दिले आहे.

'शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. या प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा सहभाग असण्याची शक्यता वाटल्याने मी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. स्वर साम्राज्ञी लतादिदी हे आमचे दैवत. उभ्या देशाला जल्लोषाची संधी देणारा सचिन आमचा लाडका. यांच्या ट्वीटची चौकशी मी लावल्याची अफवा विरोधकांनी पसरवली. तीही मी कोरोनाग्रस्त असताना. चाराणे-आठाण्यात वाट्टेल त्या अफवा पसरवणाऱ्या फेक फॅक्टरी वाल्यांनो काळजी करा कायदे कडक आहेत!' असा इशारा अनिल देशमुखांनी भाजपला दिला आहे.

पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, 'सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशातील जनता मानते. त्यांच्या चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही. या ट्विट प्रकरणामध्ये भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख आणि इतर 12 इन्फ्लुएन्सरचा समावेश असल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलीस कार्यवाही केली जात आहे' असे देखील यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.