आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Anil Deshmukh Supreme Court Hearing Update; Parambir Singh | Uddhav Thackeray Sharad Pawar Govt, Maharashtra Home Minister; News And Live Updates

100 कोटी वसूलीचा आरोप:अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; वाझेच्या लेटर बॉम्बनंतर माजी गृहमंत्र्यांच्या अडचणीत वाढ

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात या गोष्टीला आव्हान देण्यात आले होते

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या निर्णायाला आव्हाण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्र्यांवर महिना 100 कोटी वसूलीचे आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांची सीबीआय चौकशी व्हावी याकरीता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने गेल्या सोमवारी पंधरा दिवसांत संबंधित आरोपाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात या गोष्टीला आव्हान देण्यात आले होते. आज त्यावर न्यायमुर्ती संजय किसन कौल आणि हेमंत गुप्ता यांच्या दुहेरी पीठ सुनावणी करतील.

यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमुर्ती जी.एस. कुळकर्णी यांच्या खंडपीठाने सोमवारी सीबीआयला पंधरा दिवसांत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही तासांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यंमत्र्यांकडे सोपविला होता. दरम्यान बुधवारी मुंबई पोलिसातील कर्मचारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्र्यांवर लेटर बॉम्ब टाकत परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाची पुष्टी केली. त्यामुळे आणखी त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...