आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया प्रकरण:गृहमंत्री देशमुख यांच्यावरील 100 कोटीच्या आरोपसंबंधी दाखल केलेल्या दोन याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यामध्ये एक जनहित याचिका असून ती मुबंई येथील वकील डॉ. जयश्री पाटील हीने दाखल केली आहे

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटीच्या आरोपसंबंधी दाखल केलेल्या दोन याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामध्ये एक जनहित याचिका असून ती मुबंई येथील वकील डॉ. जयश्री पाटील हीने दाखल केली आहे. दुसरी याचिका मुबंईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केली असून त्यामध्ये गृहमंत्र्यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. आज मुंबई येथे दुपारी बारा वाजता उच्च न्यायालयात दोन्ही याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेत गृहमंत्र्यांवर महिना 100 कोटी रुपये वसूली करण्याचे आरोप केले आहे. त्यासोबतच पोलिस विभागातील पदोन्नतीमध्ये होत असलेल्या भष्ट्राचारासंबंधीदेखील काही मुद्दे उपस्थित केले आहे. परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, गृहमंत्री देशमुख यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यापूर्वी त्याला जतन करण्याचे आवाहान केले आहे. यापूर्वी परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका आधी उच्च न्यायालयात दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार परमबीर सिंह यांनी आपली याचिका मुबंई उच्च न्यायालयात दाखल केली होती.

बातम्या आणखी आहेत...