आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल देशमुखांचे ईडीला पत्र:ईडीची माझ्या विरोधातील कारवाई कायदा, सत्तेचा गैरवापर! सुप्रीम कोर्टात आधीच आव्हान दिल्याने चौकशीसाठी हजर राहणार नाही; अनिल देशमुखांनी जारी केले पत्र

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनिल देशमुख ईडी समोर उपस्थित राहणार नाही, त्यांच्या वतीने वकील इंदरपाल उपस्थित राहणार आहेत.

100 कोटी वसुली प्रकरणामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अडचणीत सापडलेले आहेत. या प्रकरणी त्यांना सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. तसेच त्यांचा - मुलगा ऋृषीकेश यांना देखील समन्स बजावण्यात आला आहे. त्यांना आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तिसऱ्या समन्सनंतरही अनिल देशमुख हे ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत.

अनिल देशमुख ईडी समोर आज सुद्धा उपस्थित राहणार नाही, त्यांच्या वतीने वकील इंदरपाल उपस्थित राहणार आहेत. याच अनुषंगाने अनिल देशमुख यांनी ईडीचा तपास अधिकाऱ्यांचे नावे एक पत्र जारी केले आहे. त्यानुसार त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून वकील इन्‍दरपाल बी सिंग हे उपस्थित राहतील असे पत्राद्वारे कळवले आहे.

या पत्रामध्ये अनिल देशमुखांनी लिहिले की, ईडीची माझ्या विरोधातील कारवाई ही कायदा आणि सत्तेचा गैरवापर म्हणून करण्यात आली. मी सुप्रीम कोर्टात यापूर्वीच आव्हान दिले असल्याने चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच सुप्रीम कोर्टात त्यांच्या अर्जावर 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. 30 जुलैला सुप्रीम कोर्टाने 3 ऑगस्ट ही तारीख देताच ईडीने सोमवारी समन्स जारी केला असे देशमुखांनी पत्रात लिहिले आहे.

सीबीआयने केली होती छापेमारी
सरकारी तपास यंत्रणा आता आपला दिवसेंदिवस वाढवत असल्याचे दिसत आहे. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणामध्ये सीबीआयने नुकतेच अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या 12 ठिकाणांवर नुकतीच छापेमारी केली होती. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सांगली व अहमदनगर येथील ठिकाणांचा समावेश होता. आता त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...