आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडतर्फ वाझे माफीचा साक्षीदार:अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या, CBI विशेष न्यायालयाची वाझेच्या अर्जाला मंजुरी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध माफीचा साक्षीदार होणार आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी वाझेच्या अर्जाला मंजुरी दिली. वाझेने भ्रष्टाचार प्रकरणात देशमुखांसह अन्य आरोपींविरुद्ध माफीचा साक्षीदार होण्याची विनंती केली होती. न्यायालयाने वाझेला ७ जून रोजी हजर राहण्याचे आदेश दिले.

वाझे आणि देशमुख वेगवेगळ्या प्रकरणांत न्यायालयीन कोठडीत आहेत. एनआयएने वाझेला मार्चमध्ये अटक केली होती. वाझे गेल्या वर्षी २५ फेब्रुवारीला मुंबईत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाजवळ गाडीत स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. देशमुख यांना मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी बळजबरीची वसुली आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली गेल्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी ईडीने अटक केली होती. गेल्या वर्षी मार्चमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या एका पत्रात परमबीरसिंग यांनी आरोप ठेवला होता की, देशमुख अनेक चुकीच्या कामांमध्ये सहभागी होते. त्यांनी सचिन वाझेला मुंबईत बार आणि रेस्तराँतून १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने आता अनिल देशमुखांच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...