आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. आज अकरा वाजता त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी ईडीने परबांना चौकशीसाठी बोलावले होते, मात्र ते चौकशीसाठी गैरहजर होते. त्यामुळे आजच्या चौकशीसाठी परब हजेरी लावतात का? हे पाहावे लागणार आहे.
परबांची ईडीकडून मनी लाँड्रिग प्रकरणी चौकशी सूरू आहे. 26 मे रोजी ईडीने परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थानी त्याबरोबरच कार्यालय आणि इतर मालमत्तांची शोध मोहिम राबवली होती. त्यात मुंबई, पुणे, रत्नागिरी येथील मालमत्तेचा समावेश होता. छापेमारीदरम्यान ईडीने अनिल परब यांची सुमारे 12 तास चौकशी केली होती.
गेल्या चौकशीला गैरहजर
ईडीच्या एका पथकाने रत्नागिरी, खेड, दापोली येथे ठाण मांडून तपास केला होता. त्यादरम्यान ईडीने दापोलीतील साई रिसॉर्ट संबधित काही कागदपत्रे देखील ग्रामपंचायतीला अर्ज करून ताब्यात घेतले आहेत. ईडीने यापूर्वी अनिल परब यांना 15 जून रोजी सकाळी अकरा वाजता चौकशीचे समन्स बजावले होते. मात्र, त्या चौकशीला परब यांनी हजेरी लावली नव्हती. त्यानंतर आता ईडीने परबांना पुन्हा समन्स जारी केले असून, आज 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे.
आज शिवसेनेची बैठक
राज्य सभा पाठोपाठ विधान परिषदेतही शिवसेनेचे आमदार फुटल्याने शिवसेनेचे अनेक नेते मंडळी नाराज आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना बैठकीसाठी दुपारी 12 वाजता बोलावले आहे. त्यात आज अनिल परब यांची अकरा वाजता चौकशी असल्याने ते बैठकीसाठी जाणार की चौकशीसाठी हे पाहावे लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.