आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादापोलीमधील एका रिसॉर्टवरून राज्यातील वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे आणि शिवसेना नेते अनिल परबांच्या मालकिचे आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात येत आहे. रिसॉर्ट पाडण्यासाडी किरीट सोमय्या एक प्रतिकात्मक मोठा हातोडा घेत दोपालीकडे रवाना झाले आहेत. हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे. तर रिसॉर्ट प्रकरणावर अनिल परब यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली. 'तो रिसॉर्ट माझा नाही. हिंमत असेल तर रिसॉर्ट पाडून दाखवा. किरीट सोमय्या माझी बदनामी करण्यासाठी नौटंकी करत आहेत' असे खुले आव्हान परबांनी दिले आहे.
किरीट सोमय्या कशेडी घाटातून खेडमार्गे ते दापोलीच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्या साथीला भाजप नेते निलेश राणेही आले असून ताफ्यांसह ते किरीट सोमय्यांसोबत दापोलीकडे निघाले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कायदा हातात घेतला तर पोलिस कारवाई करतील असा इशारा दिला आहे. याशिवाय, किरीट सोमय्यांना कशेडी घाटात पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांकडून सोमय्यांना नोटीस देण्यात येणार होती. मात्र पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या नोटीस घेण्यास सोमय्यांनी नकार दिला. आता किरीट सोमय्या थोड्याच वेळात दापोलीत पोहोचतील. आता दोपालीत संबंधित रिसॉर्टवर सोमय्या खरचं हातोडा चालवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोमय्यांच्या दापोली दौऱ्यावर विनायक राऊतांची प्रतिक्रिया -
किरीट सोमय्यांच्या दापोली दौऱ्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. कुणी हातोडा, कुणाला कुदळ, कुणाला फावडा जे घ्यायचं आहे ते घ्या, पण हा शिवरायांचा मर्द मराठा मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणार नाही. तो लढतही राहणार आणि जिंकतही राहणार, असे ते म्हणाले.
भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने-सामने-
सोमय्या यांचे स्वागत करण्यासाठी भाजप कार्यकर्ते जमा झाले आहेत. तर सोमय्यांना आडवण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे तणाव निर्माण झाला आहे. यात भाजप कार्यकर्ते आणि शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यातून वादविवाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सोमय्यांना राष्ट्रवादीचे नेते संजय कदम यांनी कडकडीत इशारा दिला होता. किरीट सोमय्यांनी येऊनृ दाखवावं, हे कोकण आहे, गुजरात नाही. आम्ही त्यांना अडवणार, असे ते म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला आहे. भाजपकडून ठाकरे सरकारच्या नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सोमय्या सातत्याने अनिल परबांवर आरोप करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.