आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरीट सोमय्यांच्या आदेशावर ईडी चालते का?:ईडीला संपूर्ण सहकार्य करूनही कदमांना ताब्यात घेतले - अनिल परब

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या आदेशावर ईडी चालते आहे का असा सवाल माजी मंत्री अनिल परब यांनी उपस्थित केला आहे. सदानंद कदम यांनी ईडीला संपूर्ण सहकार्य करुनही त्यांना ईडीने समन्स दिले, ऑपरेशन झाल्याने 10 ते 15 दिवस विश्रातींची गरज आहे, असे त्यांनी ईडीला कळवले होते तरीही त्यांना ताब्यात घेऊन मुंबईला आणल्या गेले असा आरोप परब यांनी केला आहे.

माजी मंत्री अनिल परब म्हणाले की, सदानंद कदम यांचे कालचे हाताचे ऑपरेशन झाले आणि कालच त्यांना ईडीकडून समन्स देण्यात आले. त्यांनी विश्रांतीचह गरज असल्याचे ईडीला कळवले होते तरीही त्यांना ताब्यात घेण्यात आले असून मुंबईत आणले जात आहे. हा सर्व खेडमध्ये झालेल्या सभेचा हा परिणाम आहे का असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला. तर किरीट सोमय्या यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांनी म्हाडा प्रकरणी देखील माझ्यावर आरोप केले होते. मात्र म्हाडाने त्याबाबत स्पष्टता देत माझा काही संबंध नाही असे सांगितले होते. किरीट सोमय्या यांच्यावर मी मानहानीचा गु्न्हा दाखल केला, आणि या प्रकरणातही मी निकाल लागताच किरीट सोमय्यांना उत्तर देईल असे परब यांनी म्हटले आहे.

अनिल परब म्हणाले की, किरीट सोमय्यांना सर्व गोष्टी माहिती आहेत, याचा अर्थ किरीट सोमय्यांच्या सांगण्यावर ईडी चालते आहे का असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला आहे. आम्ही पहिल्या दिवसांपासून ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले, त्यांनी जे प्रश्न विचारले त्याला उत्तर दिले. सर्व माहिती देऊनही सदानंद कदम यांना येथे बोलावले आहे. म्हणून केवळ खेडच्या सभेचा हा परिणाम आहे का असाही प्रश्न त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...