आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारने बोजा बिस्तरा बांधावा:नैतिकता शिल्लक असेल तर एकनाथ शिंदे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अनिल परब यांची मागणी

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारने आपला बोजा बिस्तरा बांधावा. नैतिकता शिल्लक असेल तर एकनाथ शिंदे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केली आहे.

राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेतील. नार्वेकर सध्या लंडन दौऱ्यावर आहेत.

बोजाबिस्तरा बांधा

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनिल परब म्हणाले, सरकार पाडण्याचा झालेला सगळा प्रकार अवैध होता. आम्ही अध्यक्षांना याबाबत विनंती करु. त्यांना फक्त तपासून निर्णय द्यायचा आहे. आता चौकशी करण्याची गरजच नाही. कारण व्हिप सुनिल प्रभू यांचाच आहे. सरकारने आपला बोजाबिस्तरा बांधावा. नैतिकता असेल तर एकनाथ शिंदे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.

अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेऊ शकतील, कोर्टानेही असे म्हटले आहे. व्हीप कोणी इश्यु करायला पाहिजे, पक्षाचे नेतृत्व कोण करु शकते याचा निर्णय अध्यक्षच घेतील, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सत्तासंघर्षाच्या निकालावर दिली आहे.

राहुल नार्वेकर म्हणाले, कायद्यातील तरतुदींबाबत सर्वौच्च न्यायालयाने बोट ठेवले आहे. व्हीप कोणी इश्यु करायला पाहिजे, पक्षाचे नेतृत्व कोण करु शकते याचा निर्णय अध्यक्ष घेतील, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. अपात्रतेच्या याचिकेबाबत अध्यक्ष निर्णय घेतील.