आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते अनिल परब यांच्यावर इडीची टाच आली असून त्यांची तब्बल 10.20 कोटींची संपत्ती इडीने (तात्पुरती) जप्त केली. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ही कारवाई झाली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील 42 गुंठे जमीन आणि तिथे बांधलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे.
मालक म्हणून ओळख लपवली
इडीने यासंदर्भात जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, अनिल परब यांनी साई रिसॉर्टशी संबंधित परवानग्या मिळवताना स्वतःची मालक म्हणून ओळख लपवली. विभास साठे नावाच्या व्यक्तीच्या नावाने सर्व परवानग्या अनिल परब यांनी मिळवल्या, असे या प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
मालमत्तेवर तात्पुरती जप्ती
इडीच्या प्रेसरिलीजमध्ये स्पष्ट करण्यात आले की, ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र सरकारची फसवणूक करून परवानग्या मिळवल्या गेल्या. या प्रकरणी मुरुड दापोली येथील 42 गुंठे जमीन व साई रिसॉर्टची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
ही मालमत्ता जप्त स्वरुपात
अंदाजे 42 गुंटा मोजून गट क्रमांक 446, मुरुड,दापोली, रत्नागिरी, ₹ 2,73,91,000 किमतीचे आणि साई रिसॉर्ट NX चे रिसॉर्ट सदर जमिनीची किंमत ₹ 7,46,47,000
परबांची सहा महिन्यापूर्वी चौकशी
अनिल परब यांना ईडीने आज पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. गेल्या तीन दिवासांपासून त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. मंगळवारी त्यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. तर बुधवारी आठ आणि गुरुवारी सहा तास चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर आज परबांना ईडीने पुन्हा चौकशासाठी बोलावले आहे.
काय आहे प्रकरण?
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे
किरीट सोमय्यांकडून पाठपुरावा
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात आरोप केले होते. साई रिसाॅर्ट पाडण्यासाठी त्यांनी आंदोलनात्मक पावित्राही घेतला होता. त्यांनी या प्रकरणात आपला पाठपुरावा सुरुच ठेवला होता. त्यानंतर त्यांनी 31 डिसेंबर रोजीच ट्विट करत ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची यादी जाहीर केली होती. या नेत्यांवर नव्या वर्षात मोठी कारवाई होणार, असेही त्यांनी ठणकावून सांगितले होते. त्यानंतर आज अनिल परब यांच्यावर पहिली कारवाई झाली हे विशेष!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.