आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी भाजपचे नेते आशिष शेलार आणि नीतेश राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मविआच्या आजच्या सभेवरुन आशिष शेलार यांनी डिवचल्यानंतर अनिल परब यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राणेंवर देखील त्यांनी पलटवार केला आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी 'मैदान छोटे, आकडे खोटे आणि राऊतांसारखे भोंगे फक्त मोठे', असे म्हणत मविआवर हल्लाबोल केला होता. भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत वज्रमूठ सभेवर निशाणा साधला आहे. आशिष शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, जे मैदान ग्राहकोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनालाही कमी पडते, एकट्या भाजपाची सभा असते तेव्हा व्यवस्थेला जे मैदान वापरावे लागते अशा बीकेसीतील सर्वात छोट्यातील छोट्या मैदानात तीन पक्षांची सभा होत आहे. ही वज्रमुठ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शेलार माहिती लपवत आहेत
आशिष शेलार यांच्या या टीकेवर अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले आहे, गल्लीतील नेत्यांना मी उत्तर देत नाही. आशिष शेलार आणि मी दोघेही बांद्र्यातच राहतो. त्यांनी उल्लेख केलेल्या दोन्ही मैदानांबद्दल त्यांच्याकडे साधी माहितीही असू नये का? एक मैदान मेट्रोसाठी दिले आहे. तर दुसरे बुलेट ट्रेनला दिलेले आहे. शेलार याबाबत माहिती लपवत आहेत. याआधी आमच्या सभा झालेल्या आहेत. आम्ही त्यांना खुर्च्या मोजून दाखवू.
उद्धव ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद
नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. नीतेश राणे म्हणाले, लाव रे तो व्हिडिओ म्हणत नीतेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ माध्यमांसमोर ठेवला. ज्यात ते काँग्रेससमोर झुकणाऱ्यांना हिजडा संबोधतात. हाच दुवा पकडत पाहा आता काँग्रेससमोर उद्धव ठाकरे, संजय राऊत झुकत असल्याची टीका राणेंनी केली. तसेच उद्धव ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
चांगल्या डॉक्टरला दाखवण्याची गरज
नीतेश राणे यांच्यावर अनिल परब यांनी पलटवार केला आहे. अनिल परब म्हणाले, नीतेश राणे काँग्रेसमधूनच आलेले आहेत. त्यांनी याआधी काँग्रेसची चाकरी केली आहे. ते भाजपमध्ये का आले हे माहित आहे. नीतेश राणे यांना एका चांगल्या डॉक्टरला दाखवण्याची गरज आहे.
संबंधित वृत्त
राजकीय:उद्धव ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद, नीतेश राणेंची खालच्या पातळीवर टीका
नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. नीतेश राणे म्हणाले, लाव रे तो व्हिडिओ म्हणत नीतेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ माध्यमांसमोर ठेवला. ज्यात ते काँग्रेससमोर झुकणाऱ्यांना हिजडा संबोधतात. हाच दुवा पकडत पाहा आता काँग्रेससमोर उद्धव ठाकरे, संजय राऊत झुकत असल्याची टीका राणेंनी केली. तसेच उद्धव ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.