आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल परब यांचा रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त:सार्वजनिक बांधकाम विभागाने मागवल्या निविदा, महिनाभरात कारवाईची शक्यता

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यासंदर्भात एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, रिसॉर्ट पाडण्यासाठी येत्या 22 सप्टेंबरपर्यंत कंत्राटदारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सत्तांतरानंतर कारवाईला वेग

पर्यावरण विभागाकडून हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यामुळे महिनाभरात या रिसॉर्टवर कारवाई होण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरले होते. अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टच्या बांधकामात पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाले, तत्कालीन ठाकरे सरकारने याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. राज्यात सत्तांतर होताच आता रिसॉर्टवरील कारवाईला वेग आला आहे.

किरीट सोमय्या यांनीदेखील ट्विट करत हे रिसॉर्ट पाडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे की, अनिल परब यांनी 2017 मध्ये दापोली येथे जमीन विकत घेतली. ही शेतजमीन असूनही सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने ती नॉन अग्रीकल्चर करण्यात आली. त्याची नोंदणी दोन वर्षांनंतर करण्यात आली. हे रिसॉर्ट बांधकाम करताना CRZ नियमांचेही उल्लंघन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...