आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दापोलीतील साई रिसॉर्टवर अखेर हातोडा:प्रशासनाकडून पाडकामास सुरूवात, भाजप नेते किरीट सोमय्याही हातोड्यासह हजर

रत्नागिरी15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्यास अखेर प्रशासनाने सुरूवात केली आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या कथित मालकीचे हे रिसॉर्ट पाडण्यास प्रशासनाने साडे अकरा वाजेच्या सुमारास सुरूवात केली. यावेळी हातोडा घेऊन भाजप नेते किरीट सोमय्याही साई रिसॉर्टवर हजर आहेत.

आज पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास किरीट सोमय्या स्वत: मोठा हातोडा घेऊन दापोलीत दाखल झाले आहेत. दापोली पोलिस स्टेशनला भेट देऊन त्यांनी याप्रकरणी आपला जबाबही नोंदवला आहे.

दरम्यान, साई रिसॉर्ट परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस व प्रशासनाने साई रिसॉर्टच्या पाडकामाची तयारी सकाळीच पूर्ण केली आहे. आजपासून पाडकामास सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हे रिसॉर्ट जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे.

सागरी नियमांचे उल्लंघन करून मनी लॉड्रींगच्या पैशातून परबांनी हे रिसॉर्ट बांधल्याचाच आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
सागरी नियमांचे उल्लंघन करून मनी लॉड्रींगच्या पैशातून परबांनी हे रिसॉर्ट बांधल्याचाच आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

परबांवर 3 गुन्हे दाखल

दापोली येथे माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले, साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा दापोली पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यानुसार, अनिल परब यांनी ग्रामपंचायतीला बनावट कागदपत्रे देऊन 15, 800 स्क्वेअर फुटचे हे रिसॉर्ट स्वत:च्या नावावर करून घेतले.

परबांना जामीन

सोमय्यांनी सांगितले की, या रिसॉर्टप्रकरणी दुसरा गुन्हा सदानंद कदमांविरोधात दाखल झाला आहे. कोविड काळात त्यांनी अनधिकृतपणे रिसॉर्टचे बांधकाम केले, असा आरोप आहे. या गुन्ह्यात आता अनिल परब यांचाही समावेश करण्यात आला आहे. तर, तिसरा गुन्हा पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्टचे बांधकाम केले म्हणून भारत सरकारनेच दाखल केला आहे. पहिल्या गुन्ह्यात अनिल परबांना जामीन घ्यावा लागला आहे.

ठाकरेंचे भ्रष्टाचाराचे स्मारक

सोमय्यांनी सांगितले की, ठाकरे गटाचे भ्रष्टाचाराचे स्मारक आजपासून पाडण्यास सुरुवात होणार आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यानंतर आता तुरुंगात जाण्याची अनिल परब यांची वेळ आली आहे, असा इशाराही सोमय्यांनी दिला.

रिसॉर्टच्या पाडकामासाठी सोमय्या पहाटे 3.30लाच दापोलीत दाखल झाले आहेत.
रिसॉर्टच्या पाडकामासाठी सोमय्या पहाटे 3.30लाच दापोलीत दाखल झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...