आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेते किरीट सोमय्या उलटसुलट आरोप करुन सर्वांना उद्ध्वस्त करायला बसले आहेत. साई रिसॉर्टप्रकरणी आम्ही पुन्हा न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती मंगळवारी ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल परब यांनी मंगळवारी दिली.
साई रिसॉर्टला बांधकामासाठी बेकायदेशीररीत्या परवानगी दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने दापोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांचे निलंबन केले आहे. किरीट सोमय्या यांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. त्यावर अनिल परब म्हणाले, निलंबित अधिकाऱ्याशी माझा काहीही संबंध नसताना त्यांच्याशी माझे नाव जोडले जात आहे. दापोली समुद्रकिनाऱ्याजवळ केवळ साई रिसॉर्ट नाह,. तर अनेकांनी तेथे हॉटेल, रिसॉर्ट उभारले आहेत. अनेक छोटी-मोठी घरे किनारी उभी राहिली आहेत. साई रिसॉर्टवर कारवाईचा निर्णय झाल्यास या सर्वांवर कारवाई करावी लागेल.
राज्यपालांचे जाणे ही राजकीय खेळी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालपदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर परब म्हणाले, राज्यात भगतसिंह कोश्यारी हे राज्यपालपदावर टिकून राहिले, तर त्यांनी केलेल्या महापुरुषांच्या अपमानामुळेे भाजपला मोठे नुकसान होणार आहे. हे लक्षात आल्यामुळे राज्यपालांना हटवणे ही भाजपची एक राजकीय खेळी आहे.
छोटी-मोठी घरेही उद्ध्वस्त होतील; कोर्टाच्या लक्षात आणणार परब म्हणाले, न्यायालयात एकाला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा न्याय, असे चालत नाही. त्यामुळे साई रिसॉर्टवर कारवाई झाल्यास किनाऱ्यावरील सर्व घरे, छोट्या-मोठ्या हॉटेलांवर देखील कारवाई करावी लागेल. यामुळे छोटी-मोठी घरे उद्ध्वस्त होवू शकतात. अशा लोकांच्या नुकसानीची जबाबदारी ही सोमय्या व महाराष्ट्र सरकारला घ्यावी लागेल. त्यामुळेच आम्ही साई रिसॉर्टप्रकरणी पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल करून हे सर्व मुद्दे न्यायालयाच्या लक्षात आणून देणार आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.