आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमय्यांसह म्हाडा विरोधात अनिल परबांचा हक्कभंग प्रस्ताव:निलम गोऱ्हे म्हणाल्या- प्रस्ताव तपासून योग्य तो निर्णय पुढच्या आठवड्यात घेऊ

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे गटाचे नेते तथा आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत आज किरीट सोमय्या यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. सोबतच त्यांनी म्हाडाविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांशी दोन हात करण्यासाठी परब यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सोमय्यांनी केले होते परबांवर आरोप

अनिल परब यांनी म्हाडाची जमीन हडपल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. या आरोपांप्रकरणी परब यांना म्हाडातर्फे नोटीसही देण्यात आली होती. पण नंतर म्हाडाने ती मागे घेतली. या सर्व प्रकारामुळे माझी नाहक बदनामी झाली अशी स्पष्टोक्ती अनिल परब यांनी विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडल्यावर दिली.

ही केली विनंती

अनिल परब यांनी आज हक्कभंग प्रस्ताव मांडला. त्यानंतर हा हक्कभंगाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या विशेष हक्क समितीकडे पाठवावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. त्यामुळे विशेष हक्क समिती आता या प्रकरणात चौकशी करुन काय निर्णय घेते ते लवकरच समजेल.

काय म्हणाले अनिल परब

अनिल परब म्हणाले, महाराष्ट्र विधान परिषद नियम 241 अन्वये मी विशेष हक्कभंगाची सूचना देत आहे. मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना देत आहे. संबंधित प्रकरण आपण पुढील चौकशी आणि कारवाईसाठी विशेष हक्क समितीकडे पाठवावे, अशी विनंती करतो.''

माझी बदनामी केली

वेळोवेळी पत्रकार परिषद घेवून किरीट सोमय्या यांनी म्हाडाचा प्लाॅट हडपला. भुखंड लाटला असा आरोप केला. त्यानंतर माझी बाजू ऐकल्यानंतर मला दिलेली नोटीस म्हाडाने मागे घेतली परंतु या सर्व प्रकरणात माझी नाहक बदनामी झाली. वेगवेगळे आरोप करणाऱ्यावर पायबंद बसावा आणि ज्या अधिकाऱ्याने मला नोटीस दिली त्या अधिकाऱ्यावर आणि किरीट सोमय्यावर मी हक्कभंग प्रस्ताव देत आहे.

योग्य तो निर्णय घेऊ - निलम गोऱ्हे

यावर विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी सांगितले की, मी हा हक्कभंग तपासून पाहते व योग्य तो निर्णय घेते. सध्या हक्कभंग समिती तयार झाली नाही त्यामुळे तो माझ्याच अखत्यारीत आहेत त्यामुळे पुढील आठवड्यात गठीत करणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...