आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:अनिल परब यांचे वकील आज ईडीसमोर बाजू मांडणार; सोमय्या म्हणाले, ठाकरे सरकारचे 11 घोटाळेबहाद्दर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी धाडी टाकल्यानंतर आघाडी सरकारमधील हालचाली वाढल्या आहेत. राजकीय द्वेषातून धाडी टाकल्याचा आरोप शिवसेनेने केला असून परब हे उद्याच्या ईडी चौकशीला हजर राहणार नसल्याचे सांगण्यात येते.

ईडीने परब यांना नोटीस पाठवली आहे. मंगळवारी परब यांना ईडी कार्यालयात हजर व्हायचे आहे. त्या पार्श्वभूमीवर परब सोमवारी घाईघाईने प्रभादेवी येथील ‘सामना’ कार्यालयात आले. त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. दोघांमध्ये दहा मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर परब लगेच परत गेले. परब उद्या ईडी कार्यालयात स्वत: हजर राहणार नसून आपला वकील पाठवतील, अशी माहिती सेनेतील सूत्रांनी दिली. नोटीस नेमक्या कोणत्या प्रकरणी पाठवली याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे तयारी करण्यास परब यांना वेळ हवा आहे. तसे उद्या ईडीला कळवण्यात येणार असल्याचे समजते.

रश्मी ठाकरे ते मुंबईच्या महापौर पेडणेकर घोटाळेबाज : सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पुन्हा घोटाळ्याचे आरोप केले. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापासून ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत ११ जणांची नावे आहेत.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी अनधिकृत बांधकाम केले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहनमंत्री अनिल परब यांची चौकशी सुरू आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बँकेचे पैसे लाटले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी गाळे ढापले आहेत. माजी मंत्री रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरेंनी मिळून जमीन घोटाळा केला. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांची एसआरएच्या भूखंडप्रकरणी चौकशी सुरू आहे, छगन भुजबळांवर आरोप आहेत. शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी दुबईत पैसे पाठवले तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला आणि पाडला.

दीवार टूटेगी नहीं : संजय राऊत
‘सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. दीवार टूटेगी नहीं, कितना भी सर पटक लो. दो साल से सर पटक रहे हैं, फिर भी दीवार टूटती नहीं. इतनी मजबूत दीवार है महाराष्ट्र सरकार की,’अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडी नोटीसप्रकरणी भाजपला डिवचले.

परबांनी पैसे कुठून आणले ?
कोकणातील मुरुड येथे रिसॉर्ट बांधण्यासाठी अनिल परब आणि त्यांचे सहकारी सदानंद कदम यांनी ५ कोटी ४२ लाख २४ हजार २०० रुपयांचा खर्च केला, असे प्रमाणपत्र सीए केतन जतानिया यांनी दिले आहे. इतके पैसे परब यांनी कोठून आणले, असे सोमय्या म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...