आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलेबाजी:शरद पवारांच्या राजीनाम्यावरून अंजली दमानियांचा टोला - म्हणाल्या भाजप राष्ट्रवादी आघाडीचा मार्ग मोकळा?

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''अजित पवार हतबल दिसत आहेत, त्यांना पवारांचा राजीनामा स्वीकारला जाईल याची खात्री करून घ्यायची आहे. भाजपलाही राष्ट्रवादी हवी आहे पण शरद पवारांशिवाय.'' असे ट्वीट करीत सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ''भाजप - राष्ट्रवादी आघाडीचा मार्ग मोकळा?'' झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांवर गत काही दिवसांपूर्वी ट्वीट करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज काही ट्वीट करुन पुन्हा अजित पवारांना टोला लगावला आहे.

राज्यातील कार्यकर्त्यांकडून शरद पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली जात आहे. शरद पवारांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. या धर्तीवर राजकीय पक्षांतील नेत्यांच्या प्रतिक्रीया येत आहेत. त्यानंतर अंजली दमानिया यांनीही त्यांच्या खास शैलीत ट्वीटद्वारे प्रतिक्रीया दिल्या.

अजित पवारांच्या भूमीकेबद्दल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे. “अजित पवार खूपच उतावीळ दिसत आहेत. शरद पवारांचा राजीनामा स्वीकारला जाईल याची ते खात्री करून घेत आहेत, असं दमानिया यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार म्हणाले की, "तुम्ही एक गैरसमज करुन घेत आहात की पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षामध्ये नाहीत असा भाग नाही. आज काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत पण सोनिया गांधींकडे पाहून चालली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या आजच्या वयाचा विचार करता त्यांच्याशी आणि सर्वांशी चर्चा करुन एका नवीन नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ पाहतो आहोत. ते नेतृत्व शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम करेल"

येऱ्या गबाळ्याने सांगायचे कारण नाही

अजित पवार म्हणाले, "शेवटी साहेब म्हणजेच पार्टी आहेत, हे कुणी येऱ्या गबाळ्यानं पण सांगायचं कारण नाही. आता पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे. पवार साहेब लोकशाहीत जनतेचं ऐकत असतात हे मी कित्येक वर्षे पाहिलेलं आहे. चव्हाण प्रतिष्ठाण, सिल्व्हर ओकवरुन तुम्हाला साहेब आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. उद्या जो पार्टीचा अध्यक्ष होईल, तो पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल" असेही अजित पवार म्हणाले.