आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअजित पवार, प्रफुल्ल पटेलांना भाजपमध्ये जायचे होते; पण त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी शरद पवारांच्या राजीनाम्याचा ड्रामा केला असा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज केला. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
अजित पवारांना पेढे भरवले नाही
अंजली दमानिया म्हणाल्या, राजकीय निरीक्षणाचा विचार केल्यानंतर आपल्याला कळते की, एखादी व्यक्ती आनंदी आहे की, दुःखी एखादा व्यक्ती आनंदी असेल तर कार्यकर्ते येऊन त्यांना पेढे भरवतात. जितेंद्र आव्हाडांना पेढेही भरवले नाही. त्यांचा चेहराही हसरा नव्हता. ते माध्यमांना न बोलताच निघुन गेले. यावरुनच बरेच काही समजते.
राजीनामा देणे गंमतच वाटली
अंजली दमानिया म्हणाल्या, दिसत होते की, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना भाजपमध्ये जायचे होते. पण त्यांचा डाव अटकावयचा कसा? हे त्यांनी केलाला एक प्रकारचा मोठा ड्रामा होता. कारण एवढ्या मोठ्या कार्यक्रमात एवढ्या कार्यकर्त्यांसमोर राजीनामा देणे मला गंमतच वाटली.
अजित पवार, पटेलांची उघड भुमिका
अंजली दमानिया म्हणाल्या, मुळ मुद्दा असा की, एखादी व्यक्ती अर्थात प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार हे दोघेच पवारांच्या राजीनाम्याला उघड समर्थन करीत होते. दुसरा अध्यक्षाला त्यांची हरकत नव्हती. बाकी मागे बरेच जण म्हणत असतील. त्याच व्यक्तीला प्रस्ताव मांडायला लावला. त्याच व्यक्तींना पत्रकार परिषद घ्यायला लावणे व तोच प्रस्ताव घेवून सिल्व्हर ओकला जाणे हे सर्व मोठे केलेले षडयंत्र आहे.
पवारांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रीया
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर अजित पवारांवर गत काही दिवसांपूर्वी ट्वीट करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही ट्वीट करुन पुन्हा अजित पवारांना टोला लगावले होते.
काय म्हणाल्या होत्या दमानिया?
पवारांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया म्हणाल्या होत्या की, ''अजित पवार हतबल दिसत आहेत, त्यांना पवारांचा राजीनामा स्वीकारला जाईल याची खात्री करून घ्यायची आहे. भाजपलाही राष्ट्रवादी हवी आहे पण शरद पवारांशिवाय.'' असे ट्वीट करीत सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ''भाजप - राष्ट्रवादी आघाडीचा मार्ग मोकळा?''
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.