आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जवळकीची चर्चा रंगली असतानाच अंजली दमानियांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा रंगली आहे.
शिंदे गटाचे 15 आमदार बाद होणार
अंजली दमानिया यांनी ट्विट करुन हा दावा केला आहे. ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. बघू आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाची भाजपला धास्ती
राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाच्या आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्याचाच संदर्भ देत सरकारमधून 15 आमदार बाद होणार, असा दावा अंजली दमानिया केला आहे. शिंदे गटाचे 15 आमदार अपात्र ठरल्यानंतर सरकार अल्पमतात येईल व महाराष्ट्रासारखे मोठे राज्य गमावणे भाजपला परवडणारे नाही. अशात भाजप अजित पवारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल व सरकार वाचवण्यासाठी काही आमदारांसह अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करतील, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
अजित पवार भाजपबाबत सॉफ्ट
आपल्या ट्विटबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, त्यांची भूमिका तशी दिसत नाही. भाजपविरोधात अजित पवार नरमाईची भूमिका घेताना दिसत आहे. राज्यात अनेक गंभीर विषय असताही यावर अजित पवार म्हणणे मांडत नाहीत व भाजपवर टीका करत नाही.
ईडीकडून अजित पवारांना दिलासा
अंजली दमानिया म्हणाल्या की, दुसरीकडे काही बातम्याही अजित पवार आणि भाजपची जवळीक वाढत असल्याचे दाखवत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीने अजित पवारांचे नाव वगळले आहे. त्यामुळे ते आता भाजपसोबत जातील असा माझा अंदाज आहे. काल मंत्रालयात एक महत्त्वाची व्यक्ती भेटली, तिनेही माझ्याशी बोलताना हाच अंदाज व्यक्त केला. मला हे सर्व राजकारण चुकीचे व घाणेरडे वाटते. असे राजकारण मला बघवत नाही. त्यामुळेच मी तसे ट्विट केले.
अंजली दमानिया यांनी पूर्वीही केला होता दावा
अजित पवार नॉटरिचेबल असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते. त्यामुळे राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. याचे ट्विटही अंजली दमानिया यांनीच केले होते. पहाटेच्या शपथविधीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता यावेळी अंजली दमानिया यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली होती. मात्र, अजित पवारांनी माध्यमांसमोर येत हा दावा चुकीचा असल्यायचे लगेच स्पष्ट केले होते.
शरद पवारांचा B प्लॅन : शिंदेंचे 16 आमदार अपात्र ठरल्यास भाजपला पाठिंब्याची चर्चा
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान, मोदींची पदवी, अदानींची जेपीसी चौकशी, ईव्हीएम या मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस व उद्धव सेनेशी विसंगत भूमिका घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीत दुफळी निर्माण झाली. शिवसेनेत फूट पडल्याने सत्तेतून पायउतार व्हावे लागलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी ‘बी प्लॅन’वर काम करत आहे. शरद पवारांची भाजप अनुकूल भूमिका हा त्याचाच भाग असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पवार याचे खंडन करत असले तरी मित्रपक्षांना मात्र त्यांच्या खेळीची धास्ती वाटतेय. यापूर्वी सावरकरांच्या मुद्द्यावर पवारांनी राहुल गांधींचे कान टोचले, आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडताना आम्हाला विचारले नव्हते, अशी वक्तव्ये करून पवार आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आणत आहेत. वाचा सविस्तर
संबंधित वृत्त
क्लीन चीट?:महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीने दाखल केले आरोपपत्र, अजित पवारांचे नाव नाही; चर्चांना उधाण
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, या आरोपपत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव नाही. त्यामुळे ईडीने अजित पवार यांना क्लीन चीट दिली का?, अशी चर्चा रंगली आहे. आतापर्यंत ईडीने या प्रकरणी अजित पवार यांची एकदाही चौकशी केली नाही. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या जवळकीची चर्चा रंगली असतानाच ईडीने घोटाळ्यातून अजित पवारांचे नाव वगळल्याने त्याची चर्चा रंगली आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.