आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Announcement Of Special Trains For Ganeshotsav On Konkan Railway Line, 162 Special Trains Will Be Released, Booking Will Start From Tomorrow

गणपती पावला:कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा, 162 विशेष रेल्वे गाड्या सोडणार, उद्यापासून बुकिंग होणार सुरू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रवास करताना प्रवाशांना कोविड -19 च्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार

गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे कोकणासाठी 162 विशेष रेल्वे गाड्या सोडणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. उद्यापासून या गाड्यांसाठी बुकिंग सुरू होणार आहे.

देशभरात सण उत्सवांना सुरूवात झाली आहे. लवकरच गणेशोत्सव येत आहे दरम्यान कोरोना काळामुळे रेल्वेगाड्या बंद आहेत. या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची जायची सोय होत नव्हती. पण आता त्यांच्यासाठी 162 विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत या ट्रेनची सुविधा असणार आहे. मध्य रेल्वेने याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रत्नागिरी, कुडाळ व सावंतवाडीसाठी या गाड्या सोडल्या जाणार आहेत. या सर्व गाड्या केवळ चाकरमान्यांसाठी राखीव असणार आहेत. दरम्यान प्रवास करताना प्रवाशांना कोविड -19 च्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...