आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन क्षेत्रांतून निवड:शरद पवार यांच्या नावाने या वर्षीपासून तीन पाठ्यवृत्ती, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची घोषणा

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शास्त्रज्ञ अनिल काकोडकर सल्लागार

माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नावाने मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यंदापासून दरवर्षी तीन क्षेत्रांत ११० उमेदवारांना पाठ्यवृत्ती दिली जाणार आहे. त्याबाबतची घोषणा प्रतिष्ठाच्या कार्यवाह व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी केली.

कृषी, साहित्य आणि शिक्षण या तीन क्षेत्रांत यंदापासून ही पाठ्यवृत्ती दिली जाणार आहे. शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप इन अॅग्रिकल्चर या गटांतर्गत कृषी क्षेत्रात नवे काही करू इच्छिणाऱ्या ८० युवक-युवतींना दरवर्षी पाठ्यवृत्ती दिली जाईल. यामध्ये निम्म्या मुली असतील. उमेदवारांना प्रतिमाह ३० हजार विद्यावेतन दिले जाणार आहे.

साहित्य क्षेत्रासाठी शरदचंद्र पवार इन्स्पायर लिटररी फेलोशिप पाठ्यवृत्ती दरवर्षी १० उमेदवारांना दिली जाईल. ३५ वर्षे वयाच्या आतील उमेदवारांची यात निवड केली जाईल.

शास्त्रज्ञ अनिल काकोडकर सल्लागार
दर्जेदार शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमातून भावी पिढी घडवणाऱ्या २० शिक्षकांना शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन दिली जाणार आहे. शाळा बंद असल्याने यंदाच्या पाठ्यवृत्तीच्या प्रवेशिका नंतर मागवण्यात येणार आहेत. त्याची माहिती शरद पवार फेलोशिप डाॅट काम संकेतस्थळावर दिली जाईल. पाठ्यवृत्तीच्या उपक्रमाचे सल्लागार अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर आहेत. दरवर्षी नवी क्षेत्रे पाठ्यवृत्तीसाठी विचारात घेतली जातील, असे काकोडकर यांनी सांगितले. कृषी पाठ्यवृत्तीसाठी नीलेश नलावडे तर साहित्य पाठ्यवृत्तीसाठी नितीन रिंढे समन्वयक म्हणून काम करणार आहेत.

अर्ज स्वीकारण्याचा दिनांक १५ नाेव्हेंबर : अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ आहे. निवडीची घोषणा १ डिसेंबर २०२१ करण्यात येईल, तर १२ डिसेंबर २०२१ रोजी शरद पवार यांच्या वाढदिवशी पाठ्यवृत्ती सन्मानपूर्वक प्रदान केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...