आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंना आणखी एक धक्का:सुभाष देसाईंचे पुत्र शिंदे गटात

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी ठाकरे गटाची साथ सोडली. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी एका जाहीर कार्यक्रमात शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला. विशेष बाब म्हणजे, चारच महिन्यांपूर्वी भाजपने भूषण देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी भूषण हे वसुली करतात, असा आरोप केला होता.

भूषण यांना शिवसेनेत प्रवेश देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आमची भूमिका आणि सरकारचे काम पाहून अनेक जण पक्षात प्रवेश करत आहेत. शिवसेनेचे आमदार आणि इतर नेत्यांप्रमाणे भूषण यांनीदेखील पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिंदे म्हणाले.

दरम्यान, भूषणच्या शिंदे गटातील प्रवेशाची घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. बाळासाहेब, उद्धव ठाकरे व ‘मातोश्री’ शी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून माझी निष्ठा आहे. आताही आणि पुढेही माझी निष्ठा तशीच अढळ राहील,अशी प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी दिली.

माझी राजकीय भूमिका वेगळी : भूषण देसाई : वडील सुभाष देसाई यांना माझ्या निर्णयाबद्दल आधीच कल्पना दिली होती. माझ्या वडिलांची एक राजकीय भूमिका असू शकते. मात्र, माझी स्वत: ची एक वेगळी राजकीय भूमिका असू शकते, असे भूषण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...