आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुस्तक:‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘ देवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक पुस्तक, पुस्तकात 'या' विषयाचे आहे विश्लेषण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘ नावाचे हे पुस्तक आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून राज्यसरकारला मिळालेल्या निधीचा लेखाजोखाच मांडला आहे. यासोबतच नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान जाहीर केले आहे. त्याचा महाराष्ट्राला कसा लाभ होणार याचे सोप्या शब्दात यात विश्लेषण आहे.

हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी टि्वटरवर दिली आहे. यामधय्ये ते म्हणाले की,‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘ हे नवीन पुस्तक वाचकांपुढे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. मराठी/हिंदी/इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. कोरोना काळात आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी समाजातील सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान जाहीर केले. त्याचा महाराष्ट्राला कसा लाभ होणार याचे सोप्या शब्दात यात विश्लेषण आहे.'

36 पानांच हे पुस्तक आहे.  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या पुस्तकाला शब्दरुपी शुभेच्छाही दिल्या. या पुस्तकर प्रकाशनाच्या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, विनोद तावडेजी, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती होती.

0