आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Another Controversy On Raj Kundra: Alleged Gambling Through Online Gaming App, MLA Ram Kadam Said 3 Thousand Crore Rupees Looted From The Poor; News And Live Updates

गेमिंगमधून फसवणूक केल्याचा आरोप:राज कुंद्रावर ऑनलाइन गेमिंगद्वारे 3,000 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप; भाजप आमदार राम कदम म्हणाले - गरिबांना लुटा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'GOD' च्यामाध्यमातून लूट - कदम

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज कुंद्राने ऑनलाईन गेमिंग 'GOD' च्यामाध्यमातून कोटीवधी रुपयांची लूट केल्याचा आरोप भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी केला आहे. त्यामुळे आता पॉर्न फिल्मनंतर आता गेमिंगमध्ये फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. गेमिंगच्या माध्यमातून पैसे उधळणे आणि वितरणाच्या नावाखाली गरीब लोकांकडून पैसे हडप केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

'GOD' च्यामाध्यमातून लूट - कदम
राज कुंद्राने अभिनेत्री शिल्पा शेट्टीची नाव व प्रतिमेचा वापर या खेळाचा प्रचार करण्यासाठी केला असल्याचा आरोप राम कदम यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. ते पुढे म्हणाले की, 'राज कुंद्राने ऑनलाइन गेम GOD च्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली. आम्ही शिल्पा शेट्टीच्या प्रतिभेचा आदर करतो, पण शिल्पा शेट्टीचा चेहरा या गेममध्ये प्रमोशनसाठी वापरला गेला असं ते यावेळी म्हणाले.

3 हजार कोटीचा हा घोटाळा
“राज कुंद्राची वियान इंडस्ट्रीजच्या नावावर एक कंपनी असून ते डायरेक्टर आहेत. वियान कंपनीचा जीओडी (गेम ऑफ डॉट्स) नावाने एक गेम आहे. हे कायदेशीर ऑनलाइन गेम म्हणून वर्णन केले गेले असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शिल्पा शेट्टी यांचे चित्र वियान कंपनीच्या लेटर हेडवर प्रमोशनसाठी वापरण्यात आले. या खेळाला शासनाने मान्यता दिल्याचे वृत्त आहे. परंतु, यामाध्यमातून राज कुंद्राने 3 हजार कोटीचा घोटाळा केला असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...