आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवा शोध:वटवाघळात सापडला आणखी एक व्हायरस; ‘बॅट कोरोना’चा कोविड-19 शी संबंध नाही

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी रॅबिज, हेन्ड्रा, मारबर्ग, निपाह, इबोलासारखे घातक विषाणू सापडले

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी वटवाघळात आढळणारा आणखी एक घातक ठरणारा विषाणू शोधला आहे. याला बॅट कोरोना असे नाव देण्यात आले असून याचा कोरोनाच्या कोविड-१९ या विषाणूशी कोणताही संबंध नाही. कोविड-१९ विषाणू अस्तित्वातच नव्हता तेव्हापासून २०१८-१९ पासून यावर अभ्यास सुरू होता. 

आयसीएमआरने वटवाघळाच्या ट्रोपस आणि राऊस्टस या दोन प्रजातींवर अभ्यास केला. ट्रोपस वटवाघळाचे नमुने केरळ, कर्नाटक, चंदीगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पुद्दुचेरी, पंजाब, तेलंगण आणि तामिळनाडूतून घेण्यात आले आहेत. ट्रोपसचे ५०८ पैकी २१, तर राऊस्टसचे ७८ पैकी ४ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात केरळ, हिमाचल, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूतील नमुनेच पॉझिटिव्ह आढळले आहेत.

आयसीएमआरच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, सध्या भारतात वटवाघळाच्या दोन प्रजातींमध्ये हा व्हायरस सापडला असून यावर सखोल अभ्यासाची गरज आहे. जेणेकरून भविष्यातील मोठ्या महामारीचा यातून अगोदरच इशारा देता येईल. तसेच, यावर उपाययोजनाही शोधता येतील. यातील एक अभ्यासक डॉ. प्रज्ञा यादव म्हणाल्या, या नव्या अभ्यासातून वटवाघळांबद्दल अगदीच नकारात्मक वातावरण निर्माण होऊ नये, हे पण पाहिले पाहिजे. परिसंस्थेसाठी (इको सिस्टिम) वटवाघळे अत्यंत महत्त्वाची आहेत. यापूर्वी रॅबिज, हेन्ड्रा, मारबर्ग, निपाह, इबोलासारखे घातक विषाणू वटवाघळात सापडले आहेत, हे येथे उल्लेखनीय आहे. चीनमध्येही कोरोना विषाणू प्रथम वटवाघळातच आढळला होता. 

बातम्या आणखी आहेत...